Sassoon Hospital : ससून रुग्णालयाच्या नवजात अतिदक्षता विभागासाठी ‘फिनोलेक्स’कडून अत्याधुनिक २-डी इको मशीन भेट

विशेष प्रतिनिधी

पुणे, Sassoon Hospital ता. २३ : फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या सीएसआर भागीदार मुकुल माधव फाउंडेशनच्या (एमएमएफ) वतीने ससून सर्वोपचार रुग्णालयातील नवजात अतिदक्षता विभागासाठी (एनआयसीयू) अत्याधुनिक २-डी इकोकार्डिओग्राफी (२-डी इको) मशीन उपलब्ध करून देण्यात आले. या उपकरणामुळे जन्मजात हृदयविकारांचे निदान अधिक लवकर आणि अचूकपणे होऊन नवजात बालकांवर वेळेत उपचार करणे शक्य होणार आहे.Sassoon Hospital

या मशीनचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्त्या ममता सिंधुताई सपकाळ यांच्या हस्ते झाले. यावेळी ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. एकनाथ पवार, अधीक्षक डॉ. यल्लप्पा यादव, एनआयसीयू विभागप्रमुख डॉ. आरती किनीकर, फिनोलेक्स इंडस्ट्रीजचे मंगेश मांतिरी व योगेश आपुकर तसेच मुकुल माधव फाउंडेशनचे सचिन कुलकर्णी आणि यास्मिन शेख उपस्थित होते.Sassoon Hospital



 

फिनोलेक्स इंडस्ट्रीज आणि मुकुल माधव फाउंडेशन यांनी २०१७ पासून ससून रुग्णालयातील ‘एनआयसीयू’च्या उन्नतीसाठी सातत्याने योगदान दिले आहे. या उपक्रमांतर्गत ५९ खाटांचे अत्याधुनिक नवजात अतिदक्षता विभाग विकसित करण्यात आला असून, अनुभवी नवजात तज्ज्ञांची नियुक्ती, डॉक्टर व परिचारिकांचे नियमित प्रशिक्षण, आवश्यक वैद्यकीय साहित्याचा पुरवठा आणि अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणांची उपलब्धता यावर भर देण्यात आला आहे.

‘एनआयसीयू’मध्ये सध्या रेटिनोपॅथी ऑफ प्रिमॅच्युरिटी (आरओपी) तपासणी, ओटोऍकॉस्टिक एमिशन (ओएई) श्रवण चाचणी, जन्मजात हृदयविकार तपासणी, ह्युमन मिल्क बँक तसेच प्रगत जीवनरक्षक सुविधा एकाच छताखाली उपलब्ध आहेत. नव्याने उपलब्ध झालेल्या २-डी इको मशीनमुळे दरमहा उपचार घेणाऱ्या सुमारे १५० नवजात बालकांना अधिक दर्जेदार व वेळेवर निदानाची सुविधा मिळणार असून त्यांच्या उपचारांमध्ये मोठी मदत होणार आहे.

सार्वजनिक आरोग्यसेवा अधिक सक्षम करण्यासाठी आणि प्रत्येक नवजात बालकाला जीवनाच्या सुरुवातीच्या अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर दर्जेदार उपचार मिळावेत, या उद्देशाने फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि मुकुल माधव फाउंडेशनचा हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरत आहे.

State-of-the-art 2D Echo machine gifted by ‘Finolex’ to Sassoon Hospital’s Neonatal Intensive Care Unit.

महत्वाच्या बातम्या