Ajit Pawar अजित पवारांची महिला आयपीएस अधिकाऱ्यावर दादागिरी, फोन लावणाऱ्या ग्रामस्थांवर गुन्हा दाखल

Ajit Pawar अजित पवारांची महिला आयपीएस अधिकाऱ्यावर दादागिरी, फोन लावणाऱ्या ग्रामस्थांवर गुन्हा दाखल

विशेष प्रतिनिधी

सोलापूर : उपमुख्यमंत्री अजित पवारांनी एका महिला आयपीएस पोलीस अधिकाऱ्यास फोनवरुन दादागिरी केली. अजित पवारांच्या या संवादाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता संबंधित गावातील शेतकरी आणि फोन लावणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. अजितदादांना अडचणीत आणणाऱ्या कुर्डू येथील 15 ते 20 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Ajit Pawar

15 ते 20 ग्रामस्थांवर सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी, ग्राम महसूल अधिकारी प्रीती शिंदे यांनी फिर्याद दिली आहे. गावातील मुरूस उपसा करताना अडवणूक केल्यानंतर येथील एका कार्यकर्त्याने थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांना फोन लावून कारवाई थांबविण्याची विनंती केली होती. त्यावेळी, अजित पवारांनीही फोनवरुन संबंधित महिला अधिकाऱ्यास कारवाई थांबवा, मी तुम्हाला आदेश देतो असे म्हणत दादागिरीची भाषा केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यामुळे, अजित पवारांवर टीकेची झोड उठल्याने आता संबंधित ग्रामस्थांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. Ajit Pawar



माढ्याच्या कुर्डू गावात रस्त्यासाठी मुरुम उत्खनन होत असल्याची तक्रार आल्यानुसार करमाळ्याच्या पोलिस उपअधीक्षक अंजना कृष्णा या घटनास्थळी पोहचल्या. मुरुम उचलण्याच्या मुद्यावरुन कुर्डू गावातील नागरीक आणि अंजली कृष्णा यांच्यामध्ये शाब्दिक जुगलबंदी रंगली. यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबा जगताप या कार्यकर्त्याने थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांना फोन लावून अंजली कृष्णा यांच्या हातात दिला. मात्र त्यांना अजित पवार आणि त्यांचा आवाज ओळखता आला नाही. तिकडून अजित पवार दोनदा सांगताना दिसले की डीसीएम अजित पवार बोल रहा हूं. ये कार्यवाही बंद करो…मेरा आदेश हैं.. त्यावर कृष्णा म्हणतात मेरे फौन पर काॅल करें..त्यावर पवार म्हणताहेत..की तुम पे अॅक्शन लूंगा.. इतनी डेरिंग है तुम्हारी..मेरा चेहरा तो पेहचानोगा ना.. असे रागावून अजित पवार बोलले … आणि अजित पवारांनी व्हिडीओ काॅल केला.

त्यावर कृष्णा बांधावरच जाऊन बसून पवारांशी बोलल्या. यात अजित पवार कारवाई थांबवण्याचे आदेश दिला. माझा फोन आलाय…तहसीलदारांना सांगा असे पवार सांगतात. घटनास्थळी हा प्रकार 3 तास चालू होता. अंजली कृष्णा आणि पवारांच्या संवादाच्या क्लिप व्हायरल झाला आहे. या प्रकरणी पोलिसांकडे कसलीही तक्रार अथवा गुन्हांची नोंद झालेली नाही. काल दुपारी हा सर्व प्रकार घडला.

Ajit Pawar’s bullying of a female IPS office

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023