Sanjay Raut : अजित पवार चोरांचे सरदार, महाराष्ट्राला भ्रष्टाचाराची किड : संजय राऊत यांचा हल्लाबाेल!

Sanjay Raut : अजित पवार चोरांचे सरदार, महाराष्ट्राला भ्रष्टाचाराची किड : संजय राऊत यांचा हल्लाबाेल!

sanjau raut and ajit pawar

विशेष प्रतिनिधी

मुंबई : अजित पवार हे चोरांचे सरदार आहेत. त्यांनी महाराष्ट्रहे चोरांचे राज्य केले आहे. व्होट चोरी देखील त्यामध्ये आली. तुम्ही महाराष्ट्र चोरत आहात आणि उत्तम महाराष्ट्राला भ्रष्टाचाराची किड लावत आहात,” असा हल्लाबाेल शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला.



महिला आयपीएस अधिकाऱ्याला केलेल्या दमबाजीवरून जाेरदार टीका करताना राऊत (Sanjay Raut) म्हणाले, अजित पवार हे इतरांना कायदा शिकवतात. हे करेल, ते करेल, अशा धमक्या देतात, मात्र ते स्वतःच एका महिला आयपीएस अधिकाऱ्याला धमकावण्याचा व्हिडिओ समोर आल्याने अडचणीत आले आहेत. मी बेशिस्त खपवून घेणार नाही, म्हणणारे एका तरुण महिला आयपीएस अधिकाऱ्याला दम देतात. त्यांच्या पक्षातील चोरांना संरक्षण देण्यासाठी ते राज्याच्या तिजोरीला चूना लावत आहेत. दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी मिळून अर्धा महाराष्ट्र लूटला आहे आणि अर्धा महाराष्ट्र त्यांच्या हस्तकांनी लुटावा म्हणून ते प्रशासनावर दबाव आणत आहे, अजित पवार यांनी नैतिकदृष्ट्या राजीनामा दिला पाहिजे.

अजित पवार हे कायम शिस्त आणि डिसिप्लिनची भाषा करत असतात, मात्र त्यांनी अवैध उत्खनन करणाऱ्यांना संरक्षण दिले. हा प्रकार राज्याच्या तिजोरीला चूना लावणारा आहे. आयपीएस अधिकाऱ्याला धमकावणे, हिच का तुमची शिस्त, असा सवाल करत राऊत म्हणाले, अजित पवार यांना नैतिकदृष्ट्या सरकारमध्ये राहण्याचा अधिकार उरत नाही, अशा प्रकरणांमध्ये याआधी अनेकांना राजीनामे द्यावे लागले आहे. या राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणवून घेणारा माणूस बेकायदेशीर कामाला पाठिंबा देण्याचे सांगत आहे. महाराष्ट्राच्या एका तरुण महिला आयपीएस अधिकाऱ्याला उपमुख्यमंत्री अजितदादा पवार सांगत आहेत की, मी सांगतो ते काम कर. मला कायदा शिकवू नको.” हे बेकायदेशीर काम करण्यास सांगून ते प्रशासनावर दबाव आणत आहेत,.

मंत्र्यांना लाज वाटली पाहिजे, तुम्ही उघडपणे दुसऱ्याच्या फोनवरुन आयपीएस अधिकाऱ्याला धमकावता. कोणासाठी चालंलं हे?” असा सवाल करत ते म्हणाले की, “या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी अर्धा महाराष्ट्र लुटला आहे. आता उरलेला अर्धा महाराष्ट्र त्यांच्या हस्तकांनी लुटावा म्हणून ते प्रशासनावर दबाव आणत आहे. एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याकडे जी माणसं आहेत ते सर्व चोर, डाकू, स्मग्लर, बलात्कारी आहेत. त्यांना संरक्षण देण्यासाठी त्यांना सत्तेत घेण्यात आले आहे. सुनील शेळके या आमदाराने सरकारला कोट्यवधी रुपयांचा चूना लावला आणि अजित पवार हे त्याला संरक्षण देतात. असे असंख्य लोक आहे. असे सर्व ईडीवाले, सीडीवाले भाजपने गोळा केले आहेत. अजित पवारांवरच 70 हजार कोटीच्या घोटाळ्याचा आरोप पंतप्रधान मोदींनी केला होता, असा आरोप संजय राऊत यांनी केला.

Ajit Pawar is the Kingpin of Thieves, Corruption Plagues Maharashtra: Sanjay Raut’s Attack

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023