विशेष प्रतिनिधि
पुणे : गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी ४ ते १५ सप्टेंबर या कालावधीत गणेश मूर्ती विसर्जनाच्या दृश्यांचे चित्रीकरण आणि प्रसार करण्यास मनाई केली आहे. भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या (बीएनएसएस) कलम १६३ अंतर्गत हा आदेश जारी करण्यात आला आहे. Ganesh idol
या निर्देशाचा उद्देश गणेश चतुर्थी उत्सवादरम्यान जातीय व धार्मिक सलोखा राखणे हा आहे. विसर्जन मिरवणुकीदरम्यान होणारे गोंधळ टाळण्यासाठी हा आदेश देण्यात आला आहे, असे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. व्हिडिओ किंवा छायाचित्रांचे अनिर्बंध शेअरिंग केल्याने नागरिकांच्या भावना दुखावू शकतात. तसेच, त्यामूळे उत्सवाच्या दिवसांत शहरातील शांततेच वातावरण बिघडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
गणेशोत्सवाला २७ ऑगस्ट रोजी सुरूवात झाली. ६ सप्टेंबर अनंत चतुर्दशीच्या मुहूर्तावर राज्यभरातील अनेक सार्वजनिक मंडळ तसेच कुटुंबे त्यांच्या गणेश मूर्तीचे विसर्जन करतात. मात्र याचदरम्यान काही छायाचित्रे किंवा विडियो मुळे समाजातील काही घटकांच्या धार्मिक भावना दुखवण्याची शक्यता असते. असे होऊ नये यासाठीच पोलीस प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. Ganesh idol
उत्सवादरम्यान शहरातील वातावरण बिघडू नये त्यामुळे हा निर्देश काढल्याचं पोलीस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. नद्या, तलाव किंवा कृत्रिम विसर्जन कुंदामधील विसर्जन दाखवणाऱ्या माध्यमांवर पोलिसांद्वारे बंदी घालण्यात आली आहे.
त्याचप्रमाणे या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांना भारतीय न्याय संहिते (BNS) अंतर्गत कारवाईला सामोरे जावे लागू शकते, असा इशाराही पोलीस अधिकाऱ्यांनी दिला आहे. Ganesh idol
Do not depict Ganesh idol after immersion; otherwise action will be taken…!
महत्वाच्या बातम्या
- Laxman Hake : मराठा आरक्षण आंदोलनापुढे हतबल होऊन ओबीसींचे आरक्षण संपवले, लक्ष्मण हाके न्यायालयात दाद मागणार
- cabinet meeting : दिव्यांगांच्या अर्थसहाय्यात एक हजार रुपयांची वाढ, मेट्राेला गती : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
- Navnath Ban : राऊतांनी राहुल गांधींच्या अपयशी प्रयोगांचे कौतुक थांबवावे- नवनाथ बन
- Gunaratna Sadavarte : मुख्यमंत्री ब्राह्मण समाजाचे आहेत म्हणून त्यांना टार्गेट करू नका; सदावर्तेंचा इशारा