विशेष प्रतिनिधी
पुणे: पुण्यातील वैभवशाली गणेश विसर्जन मिरवणूक लवकर संपविण्यासाठी पोलिसांनी केलेले नियोजन फसले. अनेक गणेश मंडळानी डीजे सुरूच ठेवण्याचा हट्ट धरल्याने मिरवणूक अद्यापही सुरू आहे. Ganesh Mandal
काल रात्री बारा वाजता डीजे बंद करण्यात आल्याने अनेक गणेश मंडळांनी त्यांची विसर्जन मिरवणूक जागेवर थांबवण्याचा निर्णय घेतला होता. पहाटे सहा वाजता या मंडळांनी पुन्हा डीजे सुरु करुन विसर्जन मिरवणूक पुन्हा सुरु केली .
पुण्यातील विसर्जन मिरवणूकीला २४ तासापेक्षा जास्त काळ पूर्ण झाला आहे. मात्र अजुनही मोठ्या प्रमाणात गणपती मंडळांच्या विसर्जन मिरवणूका सुरु आहेत. काल साडेनऊ वाजता पुण्यातील विसर्जन मिरवणूकीला सुरुवात झाली होती. पाच मानाच्या गणपतींचे आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे विसर्जन वेळेत झाले. मात्र त्यानंतर पुण्याची विसर्जन मिरवणूक रेंगाळली.
मानाचा पहिला कसबा गणपती3:47 वाजता म्हणजे 6 तास 17 मिनिटांनी विसर्जन झालं.
मानाचा दुसरा तांबडी जोगेश्वरी गणपतीचे 4:10 वाजता म्हणजे 6 तास 40 मिनिटांनी विसर्जन झालं. मानाचा तिसरा गणपती असलेल्या गुरुजी तालीम मंडळाचे 4:35 वाजता म्हणजे 7 तास 05 मिनिटांनी विसर्जन झालं.मानाचा चौथा तुळशीबाग गणपतीचे 4:59 वाजता म्हणजे 7 तास 29 मिनिटांनी विसर्जन झालं. मानाचा पाचवा केसरीवाडा गणपती5:39 वाजता म्हणजे 8 तास 09 मिनिटांनी विसर्जन झालं.
मात्र त्यानंतर मिरवणूक रेंगाळली. अखिल मंडई मंडळाच्या कार्यकर्त्यांनी इतर मंडळे घुसखोरी करत असल्याचा आरोप करत मिरवणूक थांबविली होती. त्यावरून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी त्यांचा वाद झाला होता.
पुण्यातील अनेक मंडळांचे डीजे हे वैशिष्ट्य आहे. पोलिसांनी रात्री बारा वाजता डीजे बंद केले. त्यामुळे या मंडळानी रस्त्यावरच बसकन मारली. सकाळी सहा वाजता डीजे सुरू करण्याची परवानगी मिळाल्यावर मिरवणूक सुरू केली. त्यामुळे मिरवणूक अद्यापही सुरू आहे.
The procession has been delayed this year too due to the insistence of the Ganesh Mandal DJ.
महत्वाच्या बातम्या
- Laxman Hake : मराठा आरक्षण आंदोलनापुढे हतबल होऊन ओबीसींचे आरक्षण संपवले, लक्ष्मण हाके न्यायालयात दाद मागणार
- cabinet meeting : दिव्यांगांच्या अर्थसहाय्यात एक हजार रुपयांची वाढ, मेट्राेला गती : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
- Navnath Ban : राऊतांनी राहुल गांधींच्या अपयशी प्रयोगांचे कौतुक थांबवावे- नवनाथ बन
- Gunaratna Sadavarte : मुख्यमंत्री ब्राह्मण समाजाचे आहेत म्हणून त्यांना टार्गेट करू नका; सदावर्तेंचा इशारा