विशेष प्रतिनिधी
काठमांडू: Balen Shah नेपाळमध्ये आजवरचं सर्वात मोठं नागरिक आंदोलन उभं राहिलं आहे. या आंदोलनामुळे पंतप्रधान के.पी. शर्मा ओली आणि राष्ट्रपती रामचंद्र पौडेल या दोघांनी राजीनामा दिला. देशात आता पुढचा नेता कोण, या प्रश्नावर चर्चेला उधाण आलं आहे.Balen Shah
या जनरेशन Z आंदोलनाच्या मध्यभागी दोन चेहरे झळकत आहेत. पहिला म्हणजे काठमांडूचे महापौर बलेंन शाह, ज्यांना आंदोलनकर्ते अंतरिम पंतप्रधान बनवण्याची मागणी करत आहेत. दुसरे म्हणजे ‘हामी नेपाळ’ या संघटनेचे संस्थापक सुधान गुरूंग, ज्यांनी प्रत्यक्ष मैदानावर आंदोलनाची सूत्रं हातात घेतली आहेत.Balen Shah
बलेंन शाह हे मूळचे रॅपर असून 2022 मध्ये स्वतंत्र उमेदवार म्हणून त्यांनी काठमांडू महापौरपदाची निवडणूक जिंकली. तरुणांमध्ये त्यांचा प्रभाव प्रचंड आहे. 7 सप्टेंबर रोजी शाह यांनी फेसबुक पोस्टद्वारे आंदोलनाला उघड पाठिंबा दर्शवला. त्यांनी स्पष्ट सांगितलं की, “ही जमलेली गर्दी खरी GenZ आहे. मी वयाने मोठा आहे, पण त्यांच्या इच्छाशक्तीला मी नमन करतो. कोणत्याही राजकीय पक्षाने किंवा नेत्याने हा आंदोलनाचा फायदा घ्यायचा प्रयत्न करू नये. दुसऱ्या दिवशी हजारो तरुणांनी काठमांडूसह सात शहरांत रस्त्यावर उतरून सोशल मीडियावरील बंदीविरोधात मोर्चे काढले. हा रोष लगेच ओली यांच्या राजीनाम्याच्या मागणीत परिवर्तित झाला. हिंसक चकमकींमध्ये 19 जणांचा मृत्यू झाला, 300 हून अधिक जखमी झाले.पुढे शाह यांनी आंदोलनकर्त्यांना शांततेचं आवाहन केलं: “देश तुमच्या हातात आहे. सार्वजनिक मालमत्ता तोडू नका, आता घरी जा.”
सुधान गुरूंग हे ‘हामी नेपाळ’ या संस्थेचे संस्थापक असून, ते नागरिक चळवळीतील आघाडीचे नेतृत्व करत आहेत. 2015 च्या भूकंपानंतर मदतकार्यातून ही संस्था पुढे आली. गुरूंग यांनी सोशल मीडिया आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना व तरुणांना संघटित केलं. आंदोलन शांततेने कसं करावं, याबाबत मार्गदर्शन करत त्यांनी युवकांना शाळेचा गणवेश परिधान करून पुस्तके घेऊन रस्त्यावर उतरायला सांगितलं. “नेपो किड्स” विरोधी मोहिमेद्वारे त्यांनी भ्रष्टाचार आणि नातेसंबंधांच्या राजकारणाला थेट लक्ष्य केलं.
9 सप्टेंबर 2025 रोजी ओली आणि पौडेल यांच्या राजीनाम्याने नेपाळच्या राजकारणात ऐतिहासिक वळण आलं.आता नेपाळ नव्या नेतृत्वाच्या प्रतीक्षेत आहे आणि या संपूर्ण चळवळीने जगभराचं लक्ष वेधून घेतलं आहे.
The overthrow of the Oli government led by rapper-turned-mayor Balen Shah and strategist Sudhan Gurung
महत्वाच्या बातम्या
- Vice Presidential election : उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विरोधकांना दणका; तब्बल 30 मते फुटली !
- Ayush Komkar murder case : आयुष कोमकर हत्या प्रकरण; बंडू आंदेकरसह 8 जण अटकेत
- double-decker buses : आता पुण्यातही धावणार डबल-डेक्कर बस?
- Pune Commissioner : पुण्यातील रखडलेल्या प्रकल्पांबाबत आयुक्त घेणार मुख्यमंत्र्यांची भेट!