विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : C. P. Radhakrishnan राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक म्हणून १६व्या वर्षी सामाजिक कार्याला सुरुवात करणारे आणि पुढे भाजपाचे ज्येष्ठ नेते म्हणून ओळखले जाणारे सी. पी. राधाकृष्णन आता देशाचे नवे उपराष्ट्रपती झाले आहेत. तामिळनाडूतील कोईम्बतूरचे खासदार, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष, झारखंडचे राज्यपाल अशी विविध पदे भूषविल्यानंतर त्यांचा प्रवास थेट उपराष्ट्रपती पदापर्यंत पोहोचला आहे.C. P. Radhakrishnan
आज सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत उपराष्ट्रपतीपदासाठी मतदान पार पडले. सायंकाळी 7.30 वाजता निकाल जाहीर झाला आणि एनडीए उमेदवार सी. पी. राधाकृष्णन विजयी झाले. त्यांना 452 मते मिळाली, तर इंडिया आघाडीचे उमेदवार माजी न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी यांना 300 मते मिळाली. अशा प्रकारे राधाकृष्णन यांनी 152 मतांच्या फरकाने स्पष्ट विजय मिळवला.C. P. Radhakrishnan
राधाकृष्णन यांनी 1998 आणि 1999 मध्ये कोईम्बतूर लोकसभा मतदारसंघातून सलग दोन वेळा खासदार म्हणून विजय मिळवला. ते तामिळनाडूमध्ये भाजपाचे प्रदेशाध्यक्ष राहिले आहेत. 2004 ते 2007 या काळात त्यांनी रथयात्रा काढून नदीजोड प्रकल्प, अस्पृश्यता निर्मूलन आणि दहशतवादाविरोधी जनजागृती केली.
2016 ते 2019 दरम्यान ते ऑल इंडिया कॉयर बोर्डाचे अध्यक्ष होते. 2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने त्यांना उमेदवारी दिली होती, मात्र त्या निवडणुकांत ते पराभूत झाले. 18 फेब्रुवारी 2023 रोजी राष्ट्रपतींनी त्यांची झारखंडचे राज्यपाल म्हणून नियुक्ती केली होती.
या निवडणुकीत 767 खासदारांनी मतदान केले होते. त्यापैकी 15 मते अवैध ठरली. राज्यसभेचे सरचिटणीस पी. सी. मोदी यांनी निकाल जाहीर करताना राधाकृष्णन यांना पहिल्या पसंतीची 452 मते मिळाल्याचे सांगितले. तर सुदर्शन रेड्डी यांना 300 मते मिळाली.
2022 च्या उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधक उमेदवाराला केवळ 26 टक्के मते मिळाली होती. मात्र यंदा विरोधी मतांची टक्केवारी 40 टक्क्यांपर्यंत वाढली. तरीही राधाकृष्णन यांनी स्पष्ट बहुमतासह विजय मिळवून देशाचे १५वे उपराष्ट्रपती होण्याचा मान मिळवला.
From RSS Volunteer to Vice President: The Journey of C. P. Radhakrishnan
महत्वाच्या बातम्या
- Vice Presidential election : उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विरोधकांना दणका; तब्बल 30 मते फुटली !
- Ayush Komkar murder case : आयुष कोमकर हत्या प्रकरण; बंडू आंदेकरसह 8 जण अटकेत
- double-decker buses : आता पुण्यातही धावणार डबल-डेक्कर बस?
- Pune Commissioner : पुण्यातील रखडलेल्या प्रकल्पांबाबत आयुक्त घेणार मुख्यमंत्र्यांची भेट!