Manoj Jarange : भुजबळ देवेंद्र फडणवीस यांच्याहून मोठे नाहीत, नाराज असतील तर हिमालयात जावे, मनोज जरांगे यांचा सल्ला

Manoj Jarange : भुजबळ देवेंद्र फडणवीस यांच्याहून मोठे नाहीत, नाराज असतील तर हिमालयात जावे, मनोज जरांगे यांचा सल्ला

Manoj Jarange

विशेष प्रतिनिधी

छत्रपती संभाजी नगर: Manoj Jarange मंत्री छगन भुजबळ हे महायुती सरकारसाठी डोकेदुखी ठरत आहेत. छगन भुजबळ हे देवेंद्र फडणवीस यांच्याहून मोठे नाहीत. भुजबळ नाराज असतील तर त्यांनी हिमालयात जावे, असा सल्ला मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी दिला आहे.



छगन भुजबळ यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यास तीव्र विरोध केला आहे. त्यांनी या प्रकरणी सरकारने मराठा आरक्षणासंबंधी काढलेला जीआर रद्द करण्याचा किंवा त्यात योग्य ती सुधारणा करण्याची मागणी केली आहे. यावर भुजबळ यांच्यावर हल्लाबोल करताना मनोज जरांगे (Manoj Jarange) म्हणाले, भुजबळ यांच्या भूमिकेमुळे सरकार व मराठा समाजातील तणाव वाढू शकतो. भुजबळ सरकारसाठी धोक्याची घंटा ठरत आहेत.छगन भुजबळ हे देवेंद्र फडणवीस यांच्याहून मोठे नाहीत. भुजबळ नाराज असतील तर त्यांनी हिमालयात जावे. मराठा आरक्षणाच्या जीआरनंतर मराठा समाज व सरकारमधील ताणतणाव कमी होत आहे. भुजबळांमुळे तो पुन्हा वाढू नये. विशेषतः भुजबळांमुळे आपल्याला डाग लागू नये याची काळजी फडणवीसांनी घ्यावी. सरकारनेच त्यांना तुरुंगाबाहेर काढले होते. आता ते सरकारलाच घातक ठरत असतील तर त्यांना पुन्हा तुरुंगात जाऊ देणेच चांगले. अन्यथा संपूर्ण महायुती सरकारला भुजबळ डाग लावू शकतात.

भुजबळांना सत्ता, प्रसिद्धी व चलतीची माज-मस्ती आहे. सरकारचे नाही माझेच ऐका असे त्यांचे म्हणणे आहे. ते काय सरकारचे बाप आहेत का? त्यांनाच सगळी अक्कल आहे का? सरकारला काहीच अक्कल नाही का? ते बिनडोक आहेत. त्यांनी त्यांना सोडवून आणले. पण आज तेच भुजबळ सरकारसाठी प्रचंड मोठी डोकेदुखी ठरत आहेत, असेही मनोज जरांगे (Manoj Jarange) यावेळी बोलताना म्हणाले.

दरम्यान, छगन भुजबळांनी मंगळवारी सरकारने मराठा आरक्षणाचा जीआर प्रचंड दबावाखाली काढल्याचा आरोप केला होता. ते म्हणाले होते, सरकारने गत 2 सप्टेंबर रोजी काढलेला जीआर हा प्रचंड दबावाखाली काढण्यात आला. या प्रकरणी ओबीसीची एक समिती स्थापन झाली. तिच्याशीही या प्रकरणी काही चर्चा झाली नाही. सरकारने यासंबंधी काही सूचना व हरकतीही मागवल्या नाहीत. या जीआरमुळे ओबीसीतील 350 हून अधिक जातींवर अन्याय झाला. त्यामुळे एकतर हा जीआर मागे घ्या किंवा त्यात योग्य ती सुधारणा करा.

Bhujbal is not bigger than Devendra Fadnavis, if he is angry, he should go to the Himalayas, advises Manoj Jarange

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023