विशेष प्रतिनिधी
काठमांडू : Sushila Karki के. पी. ओली सरकार कोसळल्यानंतर नेपाळमध्ये आता नवे राजकीय समीकरण तयार झाले आहे. नेपाळच्या माजी सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश सुषिला कार्की यांची देशाच्या अंतरिम प्रमुखपदी निवड होण्याची शक्यता प्रबळ झाली आहे. भ्रष्टाचार व घराणेशाही विरोधात पेटलेल्या जेन झेड आंदोलनकर्त्यांनी सोशल मीडियावर झालेल्या आभासी मतदानात कार्की यांना आपला पाठिंबा दर्शविला. Sushila Karki
१० सप्टेंबर रोजी झालेल्या ऑनलाइन बैठकीत एकूण ७,४११ जणांनी सहभाग घेतला. या मतदानात सुषिला कार्की यांना ३१ टक्के मते मिळाली, तर काठमांडूचे महापौर बालेन शाह यांना केवळ २७ टक्के मते मिळाली. त्यामुळे कार्की या आंदोलनकर्त्यांची पहिली पसंती ठरल्या आहेत. Sushila Karki
सुषिला कार्की या बनारस हिंदू विद्यापीठाच्या (BHU) माजी विद्यार्थीनी असून, भ्रष्टाचाराविरोधात त्यांच्या कठोर भूमिकेसाठी ओळखल्या जातात. आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे की, सोशल मीडिया बॅन हा केवळ ठिणगी होता; प्रत्यक्षात त्यांचा रोष हा भ्रष्टाचार आणि घराणेशाही विरोधातआहे.
कार्की यांनी सांगितले की, “तरुण मुला–मुलींनी माझ्यासाठी मतदान केले आहे. मी अंतरिम सरकारचे नेतृत्व करण्याची त्यांची विनंती स्वीकारली आहे.” त्या म्हणाल्या, “नेपाळमध्ये नेहमीच समस्या राहिल्या आहेत. परिस्थिती आत्ता अत्यंत कठीण आहे.”
अलीकडील हिंसाचारानंतर परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून नेपाळ आर्मीने संसद आणि महत्त्वाच्या भागांवर नियंत्रण मिळवले असून संचारबंदीचे आदेश लागू केले आहेत. आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाने आर्मीप्रमुख अशोक सिग्देल यांच्याशीही चर्चा केली आहे.
Former Chief Justice of the Supreme Court Sushila Karki, interim chief, protesters reject Balen Shah
महत्वाच्या बातम्या
- Vice Presidential election : उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विरोधकांना दणका; तब्बल 30 मते फुटली !
- Ayush Komkar murder case : आयुष कोमकर हत्या प्रकरण; बंडू आंदेकरसह 8 जण अटकेत
- double-decker buses : आता पुण्यातही धावणार डबल-डेक्कर बस?
- Pune Commissioner : पुण्यातील रखडलेल्या प्रकल्पांबाबत आयुक्त घेणार मुख्यमंत्र्यांची भेट!