विशेष प्रतिनिधी
पणजी : Yashwant Sawant गाेव्यातील हणजूण आणि आसगाव येथील भूमाफिया यशवंत सावंत आणि इतरांच्या गोवा, हैदराबाद येथील १२ ठिकाणांवर ईडीच्या अधिकाऱ्यांनी छापे टाकले. या छापेमारीत ७२ लाखांची रोकड आणि काही आलिशान गाड्या जप्त केल्या आहेत. सुमारे १२०० कोटी रुपयांचा घाेटाळ्याप्रकरणी यशवंत सावंत संशियत असून त्याच्या ३.५ लाख चौरस मीटरहून अधिक जमीन बळकावल्याचा आरोप आहे. Yashwant Sawant
ईडीने केलेल्या कारवाईत रेंज रोव्हर, बीएमडब्ल्यू यासारख्या ७ आलिशान कार जप्त करून काही बँक खातीही गोठवली आहेत. ईडीने केलेल्या कारवाई एक बांधकाम व्यावसायिक व सावंत यांच्या घरावर छापा टाकण्यात आला होता. छापेमारी सुरू असल्याने राज्यात एकच खळबळ उडाली होती. गोव्यानंतर आता या प्रकरणाशी संबंधित संशयितांच्या हैदराबाद येथील ठिकाणांवरही छापेमारी करून महत्त्वाची कागदपत्रे, रोख रक्कम तसेच आलिशान कार जप्त केल्या आहेत. याशिवाय संशयितांची बँक खातीही गोठवल्याची कारवाई करण्यात आली आहे. राज्यातील भू-बळकाव प्रकरणाचा तपास हा गोवा पोलिसांचे एसआयटी पथक करीत आहे. Yashwant Sawant
ईडीकडून मनी लाँड्रिंगच्या दिशेने तपास केला जात आहे. ३.५ लाख चौरस मीटरहून अधिक जमीन बळकावल्याचा आरोप संशयितांवर असून या घोटाळ्याची व्याप्ती १२०० कोटी रुपये इतकी असल्याचे म्हटले जात आहे. ईडीकडून पुढेही या प्रकरणी कारवाई सुरूच राहिली, अशी माहिती सुत्रांनी दिली.दरम्यान, ईडीकडून ९ आणि १० सप्टेंबर २०२५ ला सलग २ दिवस सर्च ऑपरेशन करण्यात आले. जमिनीवर अवैध कब्जा केल्याचे हे प्रकरण आहे. बनावट कागदपत्रे वापरून हजारो एकर जमीन हस्तांतरित करण्यात आली होती. आरोपींनी जी जमीन हडपली त्याची बाजार भावानुसार किंमत १२०० कोटीहून अधिक आहे. Yashwant Sawant
ED raids on Goa land mafia Yashwant Sawant, luxury cars seized
महत्वाच्या बातम्या
- Laxman Hake : मराठा आरक्षण आंदोलनापुढे हतबल होऊन ओबीसींचे आरक्षण संपवले, लक्ष्मण हाके न्यायालयात दाद मागणार
- cabinet meeting : दिव्यांगांच्या अर्थसहाय्यात एक हजार रुपयांची वाढ, मेट्राेला गती : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
- Navnath Ban : राऊतांनी राहुल गांधींच्या अपयशी प्रयोगांचे कौतुक थांबवावे- नवनाथ बन
- Gunaratna Sadavarte : मुख्यमंत्री ब्राह्मण समाजाचे आहेत म्हणून त्यांना टार्गेट करू नका; सदावर्तेंचा इशारा