विशेष प्रतिनिधी
ठाणे : ठाणे महापालिकेत सत्ता आणायची असेल तर ठाण्यातील रावणाचे दहन करावे लागेल असा हल्लाबाेल वनमंत्री गणेश नाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केला हाेता. त्याला शिंदे गटाचे उपनेते विजय चौगुले यांनी प्रत्युत्तर दिले असून अंबानींच्या जीवावर मंत्रिपद मिळाले आहे. संधी मिळाली आहे तर जनसेवा करावी. कुणी आडवे करण्याची भाषा करत असेल, तर आम्ही बांगड्या भरल्या नाहीत. आम्हालाही आडवे करता येते, असा इशारा दिला आहे.
नवी मुंबई महापालिकेत मी पक्षाला सत्ता मिळवून दिली, ठाण्यातही मी सत्ता मिळवून देऊ शकतो. पण, त्यासाठी रावणाच्या अहंकाराचे दहन करावे लागले. त्यासाठी तुम्ही तयार आहात का, असे विधान वनमंत्री गणेश नाईक यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठकीत केले हाेते. Ganesh Naik
आगामी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपचे नेते आणि राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अप्रत्यक्ष इशारा दिला हाेताे. ठाणे महापालिकेवर सत्ता आणायची असेल तर रावणाच्या अहंकाराचे दहन करावेच लागेल, असं वक्तव्य त्यांनी केले आहे. Ganesh Naik
इतका अहंकार आला असेल, तर दसऱ्याला नवी मुंबईच्या रावणाचे दहन होईल. आम्ही महायुतीच्या माध्यमातून लढण्याचा प्रयत्न करत आहोत. मात्र कुणी अहंकाराची भाषा करत असेल, तर त्यांचा अहंकार आम्ही उतरवणार अशी टीका चौगुले यांनी गणेश नाईक यांच्यावर केली आहे.
We did not fill the bangles… Shinde group’s response to Ganesh Naik
महत्वाच्या बातम्या
- Laxman Hake : मराठा आरक्षण आंदोलनापुढे हतबल होऊन ओबीसींचे आरक्षण संपवले, लक्ष्मण हाके न्यायालयात दाद मागणार
- cabinet meeting : दिव्यांगांच्या अर्थसहाय्यात एक हजार रुपयांची वाढ, मेट्राेला गती : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
- Navnath Ban : राऊतांनी राहुल गांधींच्या अपयशी प्रयोगांचे कौतुक थांबवावे- नवनाथ बन
- Gunaratna Sadavarte : मुख्यमंत्री ब्राह्मण समाजाचे आहेत म्हणून त्यांना टार्गेट करू नका; सदावर्तेंचा इशारा