राहुल गांधींकडून सुरक्षेच्या नियमांचे ११३ वेळा उल्लंघन! सीआरपीएफकडून खर्गेंना पत्र, ‘यलो बुक’च्या प्रोटोकॉलचे पालन करण्याची ताकीद

राहुल गांधींकडून सुरक्षेच्या नियमांचे ११३ वेळा उल्लंघन! सीआरपीएफकडून खर्गेंना पत्र, ‘यलो बुक’च्या प्रोटोकॉलचे पालन करण्याची ताकीद

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी २०२० पासून आजपर्यंत तब्बल ११३ वेळा सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन केले असल्याचा गंभीर आरोप सीआरपीएफने केला आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय राखीव पोलीस दलाने काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना औपचारिक पत्र लिहून गांधींना नियम पाळण्याची ताकीद दिली आहे. Rahul Gandhi

राहुल गांधींना ‘झेड प्लस’ (Advanced Security Liaison) सुरक्षाव्यवस्था देण्यात आलेली आहे. या सुरक्षा कवचाखाली १० ते १२ कमांडोंचा ताफा नेहमीच त्यांच्या सोबत असतो. नियोजित दौऱ्यांपूर्वी सीआरपीएफ पथक तपासणी करून सुरक्षा यंत्रणा सज्ज ठेवते. मात्र, गांधी वारंवार अनियोजित हालचाली, पूर्वसूचना न देता केलेले प्रवास यामुळे सुरक्षा नियम धाब्यावर बसवत आहेत.

सीआरपीएफने नमूद केले आहे की, गांधींनी देशांतर्गतच नव्हे तर इटली, व्हिएतनाम, यूएई, कतार, यूके, मलेशिया अशा परदेश दौर्‍यांमध्ये देखील सुरक्षा प्रोटोकॉल तोडले. ही बाब त्यांच्या सुरक्षेसाठी ‘उच्च धोका’ असल्याचेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.


Sharad Pawar : शरद पवारांचा ‘तो’ जीआर मराठ्यांसाठी  ठरतोय अडचणीचा !


गांधींनी केलेले नियमभंग ‘भारत जोडो यात्रे’दरम्यान दिल्लीतील टप्प्यात देखील झाले होते. सीआरपीएफच्या ‘यलो बुक’मध्ये वीआयपी सुरक्षेसाठी काटेकोर नियम ठरवले आहेत. त्यानुसार, सुरक्षीत व्यक्तीने नेहमी आपल्या हालचालींची माहिती सुरक्षादलाला द्यावी लागते.

परंतु राहुल गांधी यांनी वारंवार या सूचनांकडे दुर्लक्ष केल्याचे सीआरपीएफने स्पष्ट केले आहे. त्यामुळे काँग्रेस नेत्यांनी पुढील काळात प्रोटोकॉलचे पालन करणे आवश्यक असल्याचे पत्रात ठामपणे सांगण्यात आले आहे.

Rahul Gandhi violates security rules 113 times

महत्वाच्या बातम्या

 

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023