विशेष प्रतिनिधि
पुणे : Anurag Thakur येत्या काही दिवसांतच दुबईमध्ये भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना खेळला जाणार आहे. मात्र हा सामना खेळणे म्हणजे एक प्रकारचा देशद्रोहच आहे, असे आरोप विरोधी पक्षाकडून सतत होत आहेत. यावर अखेर केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी आता आपले मत व्यक्त केले आहे. Anurag Thakur
भारत-पाकिस्तान सामन्याविषयी बोलतांना ते म्हणाले की, ‘ क्रिकेटच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धा या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) किंवा आशियाई क्रिकेट परिषद (एसीसी) घेत असते. अशा स्पर्धांमध्ये प्रत्येक देशाला भाग घ्यावा लागतो. भाग न घेतल्यास त्या देशाच्या संघाला बाहेर व्हावे लागते आणि प्रतिस्पर्धी संघाला त्याचे नाहक गुण मिळतात.’
Sharad Pawar : शरद पवारांचा ‘तो’ जीआर मराठ्यांसाठी ठरतोय अडचणीचा !
त्यामुळे या स्पर्धेत जरी भारत-पाकिस्तान सामना होणार असला तरीदेखील, द्विपक्षीय मालिकेत पाकिस्तानसोबत खेळणार नसल्याची भूमिका भारताने घेतली आहे. जोवर पाकिस्तानकडून भारतावर होणारे हल्ले थांबणार नाहीत तोवर पाकिस्तानशी द्विपक्षीय मालिका होणार नाही, असेही त्यांनी यावेळी स्पष्टपणे नमूद केले. Anurag Thakur
पुणे ऑन पेडल्स सायकल रॅली व पुणे वॉकेथॉनचे उद्धाटन केल्यानंतर अनुराग ठाकूर मधमनशी बोलत होते. यावेळी तिथे प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी तसेच, क्रिकेटपटू केदार जाधव देखल उपस्थित होते. यावेळी माजी क्रिकेटपटू केदार जाधव यांनी देखील भारताने पाकिस्तानशी क्रिकेट खेळू नये, असे नमूद केले.
विरोधी पक्षाकडून होत असलेल्या आरोपांवर बोलतांना ठाकूर म्हटले की, ‘विरोधी पक्ष सध्या भरकटलेल्या अवस्थेत आहे. संसदेचे अधिवेशन सुरू असतांना विरोधी पक्षनेते तिथे नसतात. स्वातंत्रदिनाच्या समारंभात ते नसतात. नुकत्याच झालेल्या उपराष्ट्रपतींच्या शपथविधी सोहळ्याला देखील राहुल गांधी उपस्थित नव्हते.’ एवढंच नाही तर, ‘ते विरोधी पक्षनेते असले तरी देशाला गरज असते तेव्हा ते तिथे उपस्थित नसतात. भारताचा विरोध करण्यासाठी मात्र राहुल गांधी कायम आघाडीवर असतात,’ असं म्हणत अनुराग ठाकूर यांनी राहुल गांधींवर जोरदार टीका केली. Anurag Thakur
मोदी यांच्या आईवरील व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना अनुराग ठाकूर म्हणाले, ‘आईचे स्थान प्रत्येकाच्या आयुष्यात सर्वोच्च असते. पण काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दल इतके खालच्या स्तराला गेले आहेत, की पंतप्रधानांच्या स्वर्गवासी मातोश्रींविषयी त्यांनी अपशब्द वापरले, शिव्या दिल्या, ‘एआय’ वापरून चुकीचे व्हिडिओ काढले.’ तसेच ‘यावरून कॉंग्रेसची मानसिकता स्पष्ट होते. राजकारणासाठी इतक्या खालच्या पातळीवर जाण्याची गरज आहे का?’ असा सवालही ठाकूर यांनी केला. केवळ इतकेच नाही तर ‘यावर माफी मागायची तर सोडाच, त्यांनी दुसऱ्यांदा पुन्हा तीच चूक केली, बिहारची आणि देशाची जनता काँग्रेसला कधीही माफ करणार नाही. येणाऱ्या निवडणुकांत काँग्रेसला मोठा फटका बसणार हे निश्चित आहे,’ असं भाकितही ठाकूर यांनी यावेळी केलं. Anurag Thakur
‘… India-Pakistan bilateral match will not be played till then’; Anurag Thakur
महत्वाच्या बातम्या
- Yogesh Kadam : ठाकरे बंधुंचे मराठी मतदारांना आकर्षित करण्याचे प्रयत्न अयशस्वी ठरणार ; योगेश कदम
- round of 11th admission : अकरावी प्रवेशाची विशेष फेरी, चार महिन्यांनंतरही संपेना प्रवेश प्रक्रिया
- ward structure in Pune : पुण्यातील प्रभाग रचनेवर विरोधक व नागरिकांचा रोष !
- Manoj Jarange : ओबीसी समाजाला मिळाले दुष्ट विचारांचा नेता, मनोज जरांगे यांचा हल्लाबोल