विशेष प्रतिनिधी
मुंबई: Thackeray brothers काही महिन्यांपूर्वी मराठी अस्मितेचा मुद्दा पुढे करत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले आणि महाराष्ट्राच्या राजकारणात न भूतो न भविष्यती अशी मोठी राजकीय घडामोड घडली. जे बाळासाहेबांनाही जमलं नाही, ते मराठीने करून दाखवलं, असा सूर महाराष्ट्रभर उमटू लागला. ठाकरे बंधूचं एकत्रीकरण झालं आणि “आम्ही एकत्र आलो आहोत, ते एकत्र रहाण्यासाठीच”, असं ठणकावून सांगत उद्धव ठाकरेंनी युतीचे संकेत दिले. मात्र असं असलं, तरी तेव्हा ठाकरे बंधूंच्या युतीची अधिकृत घोषणा झाली नव्हती. Thackeray brothers
Sharad Pawar : शरद पवारांचा ‘तो’ जीआर मराठ्यांसाठी ठरतोय अडचणीचा !
त्यामुळे आता एकत्र आलेले हे दोन भाऊ अधिकृतरित्या युतीची घोषणा नेमकी कधी करतील? याकडे संगळ्यांचेच लक्ष लागून आहे. म्हणूनच त्यानंतर जवळपास ४ वेळा ठाकरे बंधूंनी एकमेकांची भेट घेतली, तेव्हा प्रत्येकवेळी माध्यमांचे प्रतिनिधी त्यांच्या भेटीकडे डोळे लाऊन बसले होते. मात्र आता हे ठाकरे बंधू ऐन दसरा मेळाव्याच्या मुहूर्तावर युतीची अधिकृत घोषणा करतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
या चर्चा चालू असतांनाच, काही दिवसांपूर्वी बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार यांच्यासह कॉंग्रेसचे आणखी काही नेते मातोश्रीवर गेले होते. तेव्हा स्वत: उद्धव ठाकरेंनी त्यांच्याकडे राज ठाकरेंच्या मविआतील एन्ट्रीबद्दल शब्द टाकल्याच्या बातम्या झळकू लागल्या. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी उद्धव ठाकरे भेटीसाठी राज ठाकरेंच्या दादरच्या ‘शिवतीर्थ’ बंगल्यावर गेले. अर्थातच त्या भेटीदरम्यान काय बोलणं झालं असावं ? याबद्दल अंदाज वर्तवले जाऊ लागले आणि यंदाच्या दसरा मेळाव्यात ठाकरे बंधू अधिकृतरित्या युतीची घोषणा करतील. परिणामी महाविकास आघाडी विभागली जाणार, अशा चर्चा रंगू लागल्या. Thackeray brothers
विशेष म्हणजे सध्याची राजकीय परिस्थिती बघितली, तर ठाकरे बंधूंच्या युतीला शरद पवार देखील पाठींबा देतील, अशी चिन्हं दिसू लागली आहेत. कारण जेव्हा ५ जुलैला ठाकरे बंधुंचं मनोमिलन झालं, त्याचदिवशी ठाकरे कुटुंबाला एकत्र आणण्यासाठी सुप्रिया सुळे यांनी देखील बरेच प्रयत्न केले होते. त्यावरूनच ठाकरे बंधूच्या युतीला शरद पवार अगदी उघडपणे पाठींबा देणार, यावर शिक्कामोर्तब झाला. त्याच दरम्यान स्वत: संजय राऊत यांनी देखील महाविकास आघाडीच्या फुटीचे संकेत द्यायला सुरुवात केली. तसंच राज ठाकरेंना महाविकास आघाडीत सामील करून घेण्याबद्दल कॉंग्रेसच्या नेत्यांनी देखील उडवा उडवीची उत्तरं दिली आणि आपल्या कृतीतून ठाकरे बंधूंच्या युतीबद्दल नाराजी दाखवून दिली. Thackeray brothers
पण यात आता कॉंग्रेसची नाराजी असली, तरी आगामी महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने ठाकरे बंधू एकत्र येणार हे नक्की झालं आहे. शरद पवारांनाही त्याबद्दल काही हरकत नाही. त्यामुळे आता अर्थातच महाविकास आघाडी फुटणार, आणि कॉंग्रेस एकाकी पडणार अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. म्हणूनच आता मित्रपक्षांची साथ सुटून एकाकी पडणाऱ्या कॉंग्रेसला आगामी महापालिका निवडणुक फारच जड जाणार आहे. त्यात ऐन निवडणुकांच्या आधी कॉंग्रेसमधून बाहेर पडणाऱ्या नेते, पदाधिकारी अन कार्यकर्त्यांची संख्या देखील मोठी आहे. त्यामुळेच आगामी निवडणुकांमध्ये एकट्या पडलेल्या कॉंग्रेसला आपलं अस्तित्व टिकवून ठेवणं आव्हानात्मक असणार आहे.
तेव्हा आता ठाकरे बंधूंच्या युतीमुळे महाविकास आघाडी फुटली. तर त्यामुळे उभ्या राहणाऱ्या अडचणींना कॉंग्रेसचे नेते कसे सामोरे जातील ? आगामी महापालिका निवडणुकीत कॉंग्रेसचा टिकाव लागले का ? याची उत्तरं येत्या काळात मिळतीलच. Thackeray brothers
The future of the Congress party is in danger because of the Thackeray brothers?
महत्वाच्या बातम्या
- Yogesh Kadam : ठाकरे बंधुंचे मराठी मतदारांना आकर्षित करण्याचे प्रयत्न अयशस्वी ठरणार ; योगेश कदम
- round of 11th admission : अकरावी प्रवेशाची विशेष फेरी, चार महिन्यांनंतरही संपेना प्रवेश प्रक्रिया
- ward structure in Pune : पुण्यातील प्रभाग रचनेवर विरोधक व नागरिकांचा रोष !
- Manoj Jarange : ओबीसी समाजाला मिळाले दुष्ट विचारांचा नेता, मनोज जरांगे यांचा हल्लाबोल