Ajit Pawar : माझं चांगल काम दाखविण्‍यापेक्षा नको ते दाखवतात, अजित पवार यांची खंत

Ajit Pawar : माझं चांगल काम दाखविण्‍यापेक्षा नको ते दाखवतात, अजित पवार यांची खंत

Ajit Pawar

विशेष प्रतिनिध

 

पुणे :  Ajit Pawar : माझं चांगल काम दाखविण्‍यापेक्षा नको ते दाखवतात, अशी खंत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली.
अजित पवार यांनी जनतेच्या समस्या ऐकण्यासाठी ‘राष्ट्रवादी जनसुनावणी’ नागरिक संवाद अभियानाची घोषणा केली आहे. पुण्यातील हडपसर येथून या अभियानाला सुरुवात केली. यावेळी कुर्डू प्रकरणावर अनेक ते म्हणाले की, “कुर्डूतील घटनेबाबत मी ट्विट करुन मी भूमिका मांडली आहे. मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याची दखल घेतली आहे.



सोलापूर जिल्‍हयातील माढा तालुक्‍यातील कुर्डू गावात रस्त्यासाठी मुरुम उत्खनन होत असल्याची तक्रार समोर आली. त्यानंतर करमाळ्याच्या पोलिस उपअधिक्षक अंजना कृष्णा या घटनास्थळी पोहचल्या होत्‍या. यावेळी त्यांचा गावकऱ्यांशी वाद झाला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबा जगताप या कार्यकर्त्याने थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांना फोन लावला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवारांचे आणि अधिकारी अंजना कृष्णा यांच्यातील संवादाचा व्हिडीओ सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला होता. विरोधी पक्षांसह सत्ताधाऱ्यांनीही यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या होत्या. याबाबत त्यांनी प्रतिक्रिया दिली की, कुर्डूतील घटनेबाबत मी ट्वीट करुन मी भूमिका मांडली आहे. मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याची दखल घेतली आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महायुती सरकारमध्ये नाराज असल्याच्या चर्चा पुन्हा एकदा सुरु झाल्या आहेत. त्यांच्या नाराजीवर अजित पवार यांना विचारले असता, एकनाथ शिंदे हे अजिबात नाराज नाहीत, हे मी तुम्हाला स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का? असे अजित पवार म्हणाले. तसेच मंत्रिमंडळ बैठकीत किंवा इतरही बैठकांमध्ये आम्ही तिघेही शेजारी बसतो. त्यावेळी ते नाराज असल्याचे अजिबात जाणवत नाहीत. लोकाभिमुख कारभार व्हावा, यासाठी आमचा तिघांचाही प्रयत्न असतो असे सांगत आमच्या तिघांचेही व्यवस्थित सुरू आहे, अशी कोपरखळी अजित पवार यांनी मारली.

Instead of showing my good work, they show me what I don’t want, says Ajit Pawar

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023