विशेष प्रतिनिधी
पुणे : राज्यातील विद्यापीठांमध्ये प्राध्यापकांची संख्या कमी आहे ही बाब खरी आहे. प्राध्यापक भरती पारदर्शक पद्धतीने व्हावी, यासाठी राज्यपाल कार्यालयाकडून काही कार्यपद्धती सुचविण्यात आली होती. ही कार्यपद्धती पूर्ण झाली असून, नव्या केलेल्या बदलानुसार ८० टक्के पदे भरली जातील तसेच उर्वरित २० टक्के पदे भरण्यास आम्ही लवकरच मान्यता देऊ, अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली.
प्राध्यापकांच्या रिक्त पदाबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना फडणवीस म्हणाले, “प्राध्यापक भरती प्रक्रिया संदर्भात लवकरच निर्णय घेतला जाईल. त्याचप्रमाणे ‘एनआयआरएफ’ रैंकिंगमध्ये विद्यापीठांचे गुण कमी झाल्यामुळे रैंकिंग खाली आले आहे.
‘एनआयआरएफ’ रैंकिंगमध्ये विद्यार्थी व शिक्षक यांच्या गुणोत्तराचे गुण कमी झाले असल्याची माहिती मी कुलगुरूंकडून घेतली आहे.राज्यातील विद्यापीठांच्या कुलगुरूंशी यासंदर्भात सविस्तर चर्चा केली आहे. विद्यापीठांचे इतर घटकांचे गुण कमी न होता कसे वाढवता येतील, या दृष्टीने पुढे सुधारणा केल्या जातील.
पुण्यातील टोळीयुद्धावर बोलताना फडणवीस म्हणाले, “टोळीयुद्ध वगैरे काही नसून, आपापसांतील वैर आहे. हे वैरही आम्ही चालू देणार नाही. कोणीही डोके वर काढले तर, त्याचे डोके कसे खाली करायचे, हे सरकारला माहिती आहे.
80 percent of professor posts will be filled in the state’s universities, assures Devendra Fadnavis
महत्वाच्या बातम्या
- Laxman Hake : मराठा आरक्षण आंदोलनापुढे हतबल होऊन ओबीसींचे आरक्षण संपवले, लक्ष्मण हाके न्यायालयात दाद मागणार
- cabinet meeting : दिव्यांगांच्या अर्थसहाय्यात एक हजार रुपयांची वाढ, मेट्राेला गती : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
- Navnath Ban : राऊतांनी राहुल गांधींच्या अपयशी प्रयोगांचे कौतुक थांबवावे- नवनाथ बन
- Gunaratna Sadavarte : मुख्यमंत्री ब्राह्मण समाजाचे आहेत म्हणून त्यांना टार्गेट करू नका; सदावर्तेंचा इशारा