विशेष प्रतिनिधी
पुणे : ओबीसींसाठी जे काही केले ते आमच्या सरकारने केलेले आहे. २०१४ ते २०२५ या काळात ओबीसींसाठी जे निर्णय झाले. ते सर्व निर्णय ते आमच्या सरकारने घेतलेले आहेत. त्यामुळे विजय वडेट्टीवार यांना तर याबाबत बोलण्याचा अधिकार नाही, असा हल्लाबोल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. Vijay Vadettiwar
राज्य सरकारच्या दोन सप्टेंबरच्या अध्यादेशानुसार कुणबी प्रमाणपत्र नेमके कोणाला मिळणार? सरसकट कुणबी दाखले दिले जातील का? या सर्व प्रश्नांवर फडणवीस म्हणाले, “मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र देण्याबाबत सरकारचा अध्यादेश ओबीसींवर गदा आणणारा नाही. एकाही नकली व्यक्तीचा ओबीसींमध्ये समावेश होणार नाही, याची काळजी त्या अध्यादेशामध्ये घेण्यात आलेली आहे.
फडणवीस म्हणाले, ओबीसींचे वेगळे मंत्रालय आणणारे, ओबीसींसाठी योजना तयार करणारे, महाज्योती तयार करणारे, ओबीसींना ४२ वसतिगृह देणारेही आम्ही आहोत.ओबीसींचे पूर्ण २७ टक्के आरक्षण परत आणणारे आमचे सरकार आहे.त्यामुळे ओबीसींनादेखील माहिती आहे की त्यांचे हित पाहणारे कोण आहेत. मला असं वाटतं की जोपर्यंत दोन्ही समाजातील नेते खरी वास्तविकता काय आहे? हे समाजापर्यंत पोहोचवणार नाहीत, तोपर्यंत दोन्ही समाजात सामंजस्य होणार नाही.
Whatever was done for OBCs, our government did it, Devendra Fadnavis attacks Vijay Vadettiwar
महत्वाच्या बातम्या
- Laxman Hake : मराठा आरक्षण आंदोलनापुढे हतबल होऊन ओबीसींचे आरक्षण संपवले, लक्ष्मण हाके न्यायालयात दाद मागणार
- cabinet meeting : दिव्यांगांच्या अर्थसहाय्यात एक हजार रुपयांची वाढ, मेट्राेला गती : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
- Navnath Ban : राऊतांनी राहुल गांधींच्या अपयशी प्रयोगांचे कौतुक थांबवावे- नवनाथ बन
- Gunaratna Sadavarte : मुख्यमंत्री ब्राह्मण समाजाचे आहेत म्हणून त्यांना टार्गेट करू नका; सदावर्तेंचा इशारा