विशेष प्रतिनिधी
जालना : Laxman Hake लक्ष्मण हाके यांचे विचार गढूळ असल्याचे आम्हाला आधीपासून माहीत आहे, त्यामुळे मी त्यांना उत्तर देत नव्हतो. कुणाच्याही लेकीबाळीवर बोलण्याची आमची पद्धत नाही. धनगराची लेक असो वा मराठ्याची, ती आमचीच लेक आहे. छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे हे दोघे लक्ष्मण हाकेंच्या तोंडून अशी विधाने वधवून घेत असल्याची टीका मनोज जरांगे यांनी केली. आहे.Laxman Hake
कुणबी प्रमाणपत्राच्या आधारे ओबीसीत आलेल्यांनी त्यांच्या समुदायातील पात्र मुलांशी विवाह करावेत, असा प्रस्ताव लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे यांच्यासमोर मांडला होता. लक्ष्मण हाके यांच्या आंतरजातीय विवाहाच्या वक्तव्यावरून मराठा समाजात संतापाची लाट पसरली आहे.Laxman Hake
लक्ष्मण हाके यांच्या विधानावर प्रत्युत्तर देताना जरांगे म्हणाले, “मी आतापर्यंत त्यांच्यावर काही बोललो नाही. तुम्हाला थेट बोललो नाही. पण लक्षात ठेवा, तुमच्या लेकीबाळी मला माझ्या लेकीबाळीप्रमाणेच आहेत. कुणाच्याही लेकीबाळीवर बोलण्याची आमची पद्धत नाही. धनगराची लेक असो वा मराठ्याची, ती आमचीच लेक आहे.”Laxman Hake
मनोज जरांगे म्हणाले, अजित पवारांचे दोन कार्यकर्ते धनंजय मुंडे, आणि छगन भुजबळ यांनी त्यांना हाताखाली धरले आहे, त्यांना काही बोलता येत नाही, म्हणून ते यांच्या तोंडून त्यांची भाषा वधून घेत आहेत. त्यांचे विचार बीड जिल्ह्यात येऊन पाजाळ्याचे काम करू नका, त्या दोघांना बोलता येईना म्हणून, त्या दोघांनी तुम्हाला हाताखाली धरले आहे. परंतु लक्ष्मण हाके यांच्या ते काही लक्षात येत नाही, गरीब धनगर समाज बांधवांच्या हे लक्षात आलेले आहे. म्हणून धनगर लोक त्यांना जवळ करत नाही.
मनोज जरांगे पुढे म्हणाले, “गरीब धनगर समाज बांधवांना लक्ष्मण हाके यांचे विचार पटलेले नाहीत. म्हणूनच धनगर बांधव त्यांना जवळ करत नाहीत. मी त्यांच्यावर आधी काही बोललो नव्हतो, कारण त्यांच्या विचारांची पातळी आम्हाला ठाऊक होती. ते विनाकारण भांडण विकत घेत आहेत, हे समाजाला कळले आहे.”
मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी इशारा देत स्पष्ट केले की, “तुम्ही आरक्षणाबाबत विरोध केला, वेगळा विचार मांडला, तोपर्यंत ठीक होते. पण आता तुम्ही आमच्या अस्मितेपर्यंत आला आहात. त्यामुळे तुम्ही कोणाच्या विचाराचे माणूस आहात, हे आम्हाला कळले आहे.”
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यासमोर लक्ष्मण हाके यांनी आंतरजातीय विवाहाचा प्रस्ताव ठेवला होता. कुणबी प्रमाण पत्राद्वारे तुम्ही ओबीसीमध्ये आला आहात. आता जात-पातराहिली का? त्यामुळे चला, पहिले 11 विवाह जाहीर करू, असे आवाहन त्यांनी केले.
Laxman Hake’s thoughts are muddled, Manoj Jarange criticizes him for his statement on inter-caste marriage
महत्वाच्या बातम्या
- Laxman Hake : मराठा आरक्षण आंदोलनापुढे हतबल होऊन ओबीसींचे आरक्षण संपवले, लक्ष्मण हाके न्यायालयात दाद मागणार
- cabinet meeting : दिव्यांगांच्या अर्थसहाय्यात एक हजार रुपयांची वाढ, मेट्राेला गती : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
- Navnath Ban : राऊतांनी राहुल गांधींच्या अपयशी प्रयोगांचे कौतुक थांबवावे- नवनाथ बन
- Gunaratna Sadavarte : मुख्यमंत्री ब्राह्मण समाजाचे आहेत म्हणून त्यांना टार्गेट करू नका; सदावर्तेंचा इशारा