विशेष प्रतिनिधी
पुणे : drone ‘Varun 100’ भारतीय नौदलासाठी अभिमानाचा क्षण ठरलेला देशात बनलेला पहिला प्रवासी ड्रोन ‘वरूण 100’ आता अधिकृतपणे चर्चेत आला आहे. पुण्यातील चाकण येथे स्थित सागर डिफेन्स इंजिनिअरिंग या भारतीय कंपनीने विकसित केलेल्या या मानवरहित हवाई वाहनाची (Passenger Drone) चाचणी यशस्वीरीत्या पूर्ण झाली आहे. आपत्कालीन बचावकार्य, वाहतूक आणि लष्करी गरजांसाठी या ड्रोनचा मोठ्या प्रमाणावर उपयोग होणार आहे.
‘वरूण 100’ हे मानवरहित एरियल व्हेईकल (UAV) 100 किलो वजन सहज वाहून नेण्यास सक्षम आहे. म्हणजेच एक व्यक्ती किंवा सामान घेऊन तो सुमारे 25 ते 30 किमी अंतर पार करू शकतो. पूर्ण भारासह याचे उड्डाण सुमारे 30 मिनिटे शक्य आहे. यातील खास वैशिष्ट्य म्हणजे स्वयंचलित टेक-ऑफ व लँडिंग प्रणाली; त्यामुळे समुद्रातील जहाजांवरूनही तो कार्यरत होऊ शकतो. drone ‘Varun 100’
भारतीय नौदलाने या ड्रोनचा वापर भविष्यात नेव्हल रेस्क्यू ऑपरेशन्स, मेडिकल इव्हॅक्युएशन तसेच जलद वाहतूक यासाठी करण्याचे नियोजन केले आहे. इतकेच नव्हे तर आफ्रिकेतील काही देशांनीदेखील या भारतीय तंत्रज्ञानात रस दाखवला आहे.
सध्या ‘वरूण 100’ हा प्रोटोटाइप स्वरूपात असून, त्याचे व्यापारीकरण आणि मोठ्या प्रमाणावर उत्पादनाची प्रक्रिया सुरू आहे. देशातच विकसित झालेल्या या प्रवासी ड्रोनमुळे भारत ‘मानववाहक ड्रोन’ तंत्रज्ञानात आत्मनिर्भरतेकडे भक्कम पाऊल टाकत आहे. drone ‘Varun 100’
Successful test of India’s first passenger drone ‘Varun 100’
महत्वाच्या बातम्या
- Laxman Hake : मराठा आरक्षण आंदोलनापुढे हतबल होऊन ओबीसींचे आरक्षण संपवले, लक्ष्मण हाके न्यायालयात दाद मागणार
- cabinet meeting : दिव्यांगांच्या अर्थसहाय्यात एक हजार रुपयांची वाढ, मेट्राेला गती : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
- Navnath Ban : राऊतांनी राहुल गांधींच्या अपयशी प्रयोगांचे कौतुक थांबवावे- नवनाथ बन
- Gunaratna Sadavarte : मुख्यमंत्री ब्राह्मण समाजाचे आहेत म्हणून त्यांना टार्गेट करू नका; सदावर्तेंचा इशारा