विशेष प्रतिनिधी
मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विडंबनात्मक बदनामी केल्याने संतापलेल्या भाजप पदाधिकाऱ्यांनी काँग्रसेच्या जेष्ठ पदाधिकार्याला घेरून जबरदस्तीने साडी नेसवली. त्याचा व्हिडिओ देखील व्हायरल केला आहे.
काँग्रेसचे डोंबिवली मधील ज्येष्ठ पदाधिकारी प्रकाश पगारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आक्षेपार्ह फोटो पोस्ट केली होती. त्यानंतर भाजपा पदाधिकारी संतप्त झाले होते.
प्रकाश पगारे यांच्या सोशल मीडियावरील पोस्टनंतर मंगळवारी भाजपाचे जिल्हाध्यक्ष नंदू परब, माजी नगरसेवक संदीप माळी यांसह भाजपाच्या शिष्टमंडळाने मानपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीपान शिंदे यांची भेट घेत त्यांना निवेदन दिले. त्यानंतर प्रकाश पगारे यांना एका ठिकाणी बोलवून त्यांना जबरदस्तीने साडी नेसवली आणि त्यांचा सत्कार केला.
भाजपने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पगारे यांनी पंतप्रधान मोदी यांची विडंबनात्मक बदनामी केली आहे. अशा प्रकारच्या कृतीमुळे देशातील सर्वोच्च नेतृत्वाचा अपमान होत असून यामुळे जनतेच्या भावना दुखावल्या आहेत. भाजपा याचा तीव्र निषेध करतो. याप्रकरणाची गंभीर दखल घेत संबंधित व्यक्ती विरोधात तातडीने गुन्हा दाखल करावा असे निवेदनात म्हटले आहे.
यावर काँग्रेसचे नेते संतापले असून कल्याण जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी तातडीने पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली. ज्येष्ठ नागरिकाला अपमानस्पद वागणूक देत हे कृत्य केल्या प्रकरणी आपण कल्याण परीमंडळ 3 चे पोलिस उपायुक्त अतुल झेंडे यांची भेट घेत याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रकाश पगार म्हणाले, आपल्याला एक पोस्ट आली. ती मी व्हायरल केली. त्यांनी मला खोटं सांगून बोलावून घेऊन मला जबरदस्ती साडी नेसवली. मला साडी नेसवा अथवा काही ही करा मी काँग्रेसचे काम शेवटच्या श्वासपर्यंत करत राहणार. भाजपच्या गुंडाविरोधात लढत राहणार आहे.
BJP Leaders Force Senior Congress Leader to Wear Saree in Public Showdown
महत्वाच्या बातम्या
- Dhananjay Munde : मुंडे म्हणाले तसं, बंजारा आणि वंजारी एकच आहेत का?
- Jan Arogya Yojana : जनआरोग्य योजनेत आता २,३९९ आजारांवर उपचार, मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत निर्णय
- Nana Patole : महाराष्ट्र कर्जबाजारी, सरकारने श्वेतपत्रिका काढण्याची नाना पटाेले यांची मागणी
- एनकाउन्टरच्या भीतीने बंडू आंदेकरचा मुलगा कृष्णा पाेलीसांना शरण!