विशेष प्रतिनिधी
कोल्हापूर : राज्यात जिल्हा परिषदा – पंचायत समिती निवडणुकांचे बिगुल वाजले असताना आता महाविकास आघाडी एकत्र लढणार की नाही याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. राष्ट्रवादी काॅंग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी तसे संकेत दिले आहेत. यावर स्पष्टपणे बाेलण्यास नकार दिला असला तरी यापूर्वी अनेक निवडणुका वेगळ्या लढविल्या असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
महाविकास आघाडीतील काॅंग्रेस, शिवसेना ठाकरे गट यांच्यासाेबत विधानसभा निवडणुकीच्या काळातच राष्ट्रवादीचा जागावाटपावरून वाद झाला हाेता. त्यामुळे आता पुन्हा कार्यकर्त्यांना संधी देण्यासाठी वेगळे लढावे असा एक मतप्रवाह आहे. याबाबत सुप्रिया सुळे म्हणाल्या, यापूर्वी आम्ही अनेक वेळा निवडणुका वेगळ्या लढलेल्या आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक कार्यकर्त्यांची असते. निवडणुकीची प्रक्रिया सुरू होऊ दे, मग अधिक स्पष्टतेने बोलता येईल.
काेल्हापूर येथे अंबाबाईचे दर्शन घेतल्यानंतर पत्रकारांशी बाेलताना महायुती सरकारवर टीका करताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, पुण्यासह संपूर्ण राज्यात रस्त्यातील खड्ड्यांनी सामान्य माणूस वैतागला आहे. मोठमोठ्या प्रकल्पांना निधी देण्यासाठी सरकारच्या फाईल हलल्या जातात, पण रस्त्यांच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले जाते. शक्तिपीठ महामार्गासाठी ८० हजार कोटी खर्च करण्यापेक्षा गेली चार महिने मरणयातना भोगणाऱ्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी,
खासदार सुळे म्हणाल्या, मे महिन्यापासून महाराष्ट्रात पाऊस सुरू आहे, आम्ही जुलै महिन्यातच सरकारकडे ओल्या दुष्काळाची मागणी केली होती. आमच्या पक्षाच्या आठही खासदारांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेऊन कर्जमाफीची मागणी केली आहे.काही मंडळी बेताल वक्तव्य करून महाराष्ट्राची संस्कृती बिघडवत आहेत. संस्कृती वाचवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावण्याबाबत आपण विनंती केली आहे. महाविकास आघाडीच्या वतीने आपण जबाबदारी घ्यायला तयार आहे. कोठे तरी बोलण्याविषयी लक्ष्मण रेखा ठरवून घेऊया.
सरकारला लक्ष विचलित करायचे आहेमहागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या प्रश्नाने महाराष्ट्र धगधगत असताना त्यावरून लक्ष विचलित करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचा आरोप खासदार सुळे यांनी केला.
Disruption in Mahavikas Aghadi! Supriya Sule hints at contesting separately in local bodies
महत्वाच्या बातम्या
- Dhananjay Munde : मुंडे म्हणाले तसं, बंजारा आणि वंजारी एकच आहेत का?
- Jan Arogya Yojana : जनआरोग्य योजनेत आता २,३९९ आजारांवर उपचार, मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत निर्णय
- Nana Patole : महाराष्ट्र कर्जबाजारी, सरकारने श्वेतपत्रिका काढण्याची नाना पटाेले यांची मागणी
- एनकाउन्टरच्या भीतीने बंडू आंदेकरचा मुलगा कृष्णा पाेलीसांना शरण!