Narendra Modi : बिहारमध्येही लाडकी बहीण, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘मुख्यमंत्री महिला रोजगार योजना’चा शुभारंभ

Narendra Modi : बिहारमध्येही लाडकी बहीण, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘मुख्यमंत्री महिला रोजगार योजना’चा शुभारंभ

Narendra Modi

विशेष प्रतिनिधी

पाटणा : Narendra Modi  आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बिहारमध्येही महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी सत्ताधारी भाजप – जनता दल आघाडीने योजना आखली आहे. बिहारमध्ये महिलांच्या सबलीकरणासाठी आणि स्वावलंबनासाठी महत्त्वाची ठरणारी ‘मुख्यमंत्री महिला रोजगार योजना’ पंतप्रधान नरेंद्र मोदी 26 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुरू करणार आहेत.Narendra Modi

पंतप्रधान राज्यातील 75 लाख महिलांच्या बँक खात्यात प्रत्येकी ₹10,000 थेट जमा करणार असून एकूण ₹7,500 कोटी रुपयांचा निधी वितरित केला जाणार आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील प्रत्येक कुटुंबातील एका महिलेला प्रारंभी ₹10,000 ची अनुदानरूपी मदत थेट लाभ हस्तांतरण (DBT) द्वारे दिली जाईल. त्यानंतरच्या टप्प्यांत, ₹2 लाखांपर्यंतची अतिरिक्त आर्थिक मदतही दिली जाऊ शकते. या निधीचा वापर महिलांना आपल्या पसंतीनुसार कृषी, पशुपालन, हस्तकला, शिवणकाम, विणकाम तसेच इतर लघुउद्योग सुरू करण्यासाठी करता येईल.Narendra Modi



ही योजना केवळ आर्थिक मदत पुरविण्यावर मर्यादित नसून, महिलांना स्वयं-सहायता गटांशी संलग्न सामुदायिक साधन व्यक्तींच्या माध्यमातून प्रशिक्षण आणि मार्गदर्शन दिले जाईल. तसेच महिलांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी राज्यभरातील ‘ग्रामीण हाट-बाजार’ विकसित करण्यात येणार आहेत.

या योजनेच्या उद्घाटनावेळी राज्यभर जिल्हा, तालुका, क्लस्टर आणि गाव पातळीवर कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार असून, 1 कोटीहून अधिक महिला या कार्यक्रमाच्या साक्षीदार ठरणार आहेत.या उपक्रमामुळे बिहारमधील लाखो महिलांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार असून, त्यांना आर्थिक स्वावलंबन आणि सामाजिक सबलीकरण मिळण्यास मोठी मदत होईल.

Prime Minister Narendra Modi launched the ‘Mukhyamantri Mahila Rozgar Yojana’ in Bihar too

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023