विशेष प्रतिनिधी
मुंबई : Raj Thackeray राज्यातील अनेक भागांत अतिवृष्टीने प्रचंड नुकसान झाल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्र्यांना प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाण्याचे आदेश दिले हाेते. त्याप्रमाणे सर्व मंत्री राज्याच्या विविध भागांत जाऊन अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना आधार देत आहेत. त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनीही मराठवाड्याचा दाैरा केला. आता मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेही पूरग्रस्त भागाचा दाैरा करणार आहेत. Raj Thackeray
शनिवार आणि रविवार असे दाेन दिवस राज ठाकरे हे पूरग्रस्त भागाचा दाैरा करणार आहेत. राज ठाकरे यांनी तीन दिवसांपाूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी विविध मागण्या केल्या हाेत्या. कुठल्याही निकषांच्या चौकटीत न लावता, सरसकट ओला दुष्काळ जाहीर करा. एकरी ७ आणि ८ हजार रुपये इतक्या तुटपुंजी नुकसान भरपाईने काहीही होणार नाही. त्याऐवजी एकरी किमान ३० हजार रुपये नुकसान भरपाई घोषित करा. कारण आता शेतकऱ्याची घडी बसायला किमान १ वर्ष लागेल. गेल्या काही वर्षातल्या बेफाम उधळपट्टीने, राज्याची आर्थिक स्थिती नाजूक झालेली असली तरी, सरकारने हात आखडता घेऊ नये. वेळेस केंद्राकडे पाठपुरावा करावा आणि मदतीचं पॅकेज केंद्राकडून मिळवावं. केंद्र सरकारने बिहारला असं पॅकेज या आधी दिलं आहेच त्यामुळे महाराष्ट्राला द्यायला काही हरकत नसावी. आणि त्यासाठी दिल्लीचा जो काही पाठपुरावा करावा लागेल तो करावा. फक्त स्वतःच्या वैयक्तिक तक्रारींसाठी किंवा घटक पक्षातील संघर्षासाठी आम्ही दिल्लीत जातो असं चित्र न दिसता, सरकारमधले सगळे पक्ष राज्यासाठी पण दिल्लीत धाव घेतात हे पण राज्याला दिसू दे. Raj Thackeray
अशा आपत्तीचा पहिला फटका बसतो तो मुला-मुलींच्या शिक्षणाला. एकाही मुलाचं शिक्षण बंद होणार नाही. त्याला लागणारी वह्या-पुस्तकं मिळतील आणि अशा परिस्थितीत सहामाही परीक्षा देताना मुलांच्या मनाची काय स्थिती असेल याचा सरकारने विचार करून काही कृती तात्काळ करावी. हिंदी भाषा लादताना दाखवलेली चपळाई आणि आग्रहीपणा इथे पण दिसेल अशी अपेक्षा. आपत्तीनंतर रोगराई प्रचंड वाढते त्यासाठी राज्याचा आरोग्य विभाग सतर्क राहील हे देखील सरकारने पहावं. जिल्हा रुग्णालयांपासून ते आरोग्य केंद्रांपर्यंत, सगळीकडे औषधांचा तुटवडा पडणार नाही हे सरकारने पहावं.
संकटानंतर कर्जाच्या हप्त्यासाठी सुरु होणारा बँकांचा तगादा हा फारच तापदायक विषय असतो. एकतर बँकांना योग्य ती समज सरकारने आत्ताच द्यावी, अन्यथा आमचे महाराष्ट्र सैनिक ती देतीलच, असा इशाराही राज ठाकरे यांनी दिला आहे. Raj Thackeray
Following Uddhav, Raj Thackeray will also visit the farmers’ embankment, will visit the flood-affected areas from tomorrow
महत्वाच्या बातम्या
- Dhananjay Munde : मुंडे म्हणाले तसं, बंजारा आणि वंजारी एकच आहेत का?
- Jan Arogya Yojana : जनआरोग्य योजनेत आता २,३९९ आजारांवर उपचार, मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत निर्णय
- Nana Patole : महाराष्ट्र कर्जबाजारी, सरकारने श्वेतपत्रिका काढण्याची नाना पटाेले यांची मागणी
- एनकाउन्टरच्या भीतीने बंडू आंदेकरचा मुलगा कृष्णा पाेलीसांना शरण!