विशेष प्रतिनिधी
पुणे : Sunil Shelke मावळ मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) आमदार सुनील शेळके यांच्या हत्येचा कट उघड झाल्यानंतर अखेर या प्रकरणाचा तपास करण्यासाठी विशेष तपास पथक (SIT) तयार करण्यात आले आहे. पावसाळी अधिवेशनादरम्यान आमदार शेळके यांनी याबाबत ठोस कारवाईची मागणी केली होती. त्यानुसार गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या आश्वासनानंतर आता सरकारने हा निर्णय घेतला आहे.
पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या आदेशावरून या तपास पथकाची स्थापना झाली असून, परिमंडळ दोनचे उपायुक्त विशाल गायकवाड हे या पथकाचे प्रमुख असतील. त्यांच्या सोबत सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. विशाल हिरे, तळेगाव दाभाडेचे पोलीस निरीक्षक कन्हैया थोरात, गुंडविरोधी पथकाचे अधिकारी हरिश माने, अंबरीश देशमुख आणि अन्य पोलीस कर्मचारी देखिल या समितीत समाविष्ट आहेत. Sunil Shelke
यासंदर्भात जुलै 2023 मध्ये पिंपरी चिंचवड पोलिसांनी एक महत्त्वाची कारवाई केली होती. त्यावेळी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी तळेगाव दाभाडे येथे सात सराईतांना पकडून त्यांच्याकडून नऊ पिस्तुले, 42 काडतुसे आणि कोयते जप्त केले होते. तपासात हे आरोपी आमदार शेळके यांच्या जीवावर उठले असल्याचे स्पष्ट झाले होते. विशेष म्हणजे त्यांच्याशी कोणतेही थेट वैयक्तिक वैर नसतानाही असा कट रचण्यात आला होता. आरोपी हे पुणे, जालना आणि मध्यप्रदेश या भागांतील असून खून, खंडणी, जाळपोळ यांसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये यापूर्वीही अडकलेले आहेत. Sunil Shelke
उपायुक्त विशाल गायकवाड यांनी सांगितले की, तळेगाव दाभाडे येथे आधी नोंदवलेल्या गुन्ह्यांचा विचार करून हा तपास केला जाईल. तसेच या कटामागे आणखी कोणी प्रभावशाली हात आहे का हेही शोधले जाणार आहे. आमदार शेळके यांनी स्पष्ट केले की, त्यांच्या कडे असलेली सर्व माहिती ते समितीकडे देणार आहेत. या तपासातून कटाचा सूत्रधार कोण आहे, हे उघड झाले पाहिजे आणि तळेगाव परिसरातील वाढत्या गुन्हेगारीला देखील आळा बसला पाहिजे हाच या समितीचा प्रयत्न असेल. Sunil Shelke
The investigation into the conspiracy to murder MLA Sunil Shelke has finally been handed over to the SIT.
महत्वाच्या बातम्या
- Dhananjay Munde : मुंडे म्हणाले तसं, बंजारा आणि वंजारी एकच आहेत का?
- Jan Arogya Yojana : जनआरोग्य योजनेत आता २,३९९ आजारांवर उपचार, मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत निर्णय
- Nana Patole : महाराष्ट्र कर्जबाजारी, सरकारने श्वेतपत्रिका काढण्याची नाना पटाेले यांची मागणी
- एनकाउन्टरच्या भीतीने बंडू आंदेकरचा मुलगा कृष्णा पाेलीसांना शरण!