Hasan Mushrif : एकाने 80 आणि दुसऱ्याने 81 जागा वाटून घेतल्या, आम्हाला गृहित धरत नाहीत, हसन मुश्रीफांचा टोला

Hasan Mushrif : एकाने 80 आणि दुसऱ्याने 81 जागा वाटून घेतल्या, आम्हाला गृहित धरत नाहीत, हसन मुश्रीफांचा टोला

Hasan Mushrif

विशेष प्रतिनिधी

कोल्हापूर: Hasan Mushrif कोल्हापूर महापालिका निवडणुकीत एकाने 80 आणि दुसऱ्याने 81 जागा वाटून घेतल्या, आम्हाला गृहित धरत नाहीत, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी धनंजय महाडिक आणि राजेश क्षीरसागर यांना लगावला.Hasan Mushrif

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी चर्चा सुरु झाली असून त्यामुळे आरोप प्रत्यारोप सुद्धा होत चालले आहेत. यावरून मुश्रीफ यांनी शिवसेना शिंदे गट आणि भाजपावर थेट निशाणा साधला. मुश्रीफ म्हणाले, आम्ही लंडनवारीमध्ये असताना राज्यसभेचे भाजपचे खासदार आणि शिवसेनेचे कोल्हापूरचे विद्यमान आमदार यांनी कोल्हापूर महानगरपालिकेच्या जागा वाटून घेतल्या आहेत, एकाने 80 जागा वाटून घेतल्या आणि दुसऱ्याने 81 जागा वाटून घेतल्या असा टोला,Hasan Mushrif



मुश्रीफ म्हणाले, हे दोन्ही पक्ष महापालिकेच्या सत्तेत कुठंही दिसत नव्हते. गेली 25 वर्ष आम्ही सत्तेत होतो हे त्यांना लक्षात घ्यावच लागेल. आम्हाला जम्यात धरत नाही म्हणून हे बोलावं लागतं. आम्हाला कुठेही जमेत धरलं नाही. त्यामुळे मी म्हणालो कासवाच्या गतीने कशी सत्ता घ्यायची हे आम्हाला माहिती आहे. कुणी काहीही म्हटलं तरी महानगरपालिका आम्हाला ताकतीने लढावी लागेल. नगरपालिका आणि जिल्हा परिषदेचे मी काही भाकीत करणार नाही त्या ठिकाणी कदाचित बंडखोरी होईल, पण आमचं ठरलं आहे ज्या ठिकाणी युती होईल त्या ठिकाणी युती करायची ज्या ठिकाणी होणार नाही त्या ठिकाणी स्वबळावर लढायचं.

मुश्रीफ म्हणाले, महापालिकावर युतीचा झेंडा फडकवायचा आहे. यामध्ये सगळ्यात जास्त जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या निवडून येतील अशी तयारी आम्ही केली आहे. ज्यांचे नगरसेवक होते त्या जागांचे पहिल्यांदा वाटप होईल आणि त्यानंतर उरलेल्या जागांवर चर्चा करून वाटप होईल, असे ते म्हणाले.

दरम्यान, गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या टीकेचा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कुठलाही संबंध नसल्याचे मुश्रीफ यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोपीचंद पडळकर यांना अनेकवेळा सल्ला दिला आहे. मुख्यमंत्र्यांचा गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्याशी संबंध जोडणे पूर्णपणे चुकीचा असल्याचे ते म्हणाले.

One party shared 80 and the other 81 seats, they don’t take us for granted, says Hasan Mushrif

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023