विशेष प्रतिनिधी
न्यूयॉर्क : Operation Sindoor संयुक्त राष्ट्र महासभेत भारताने पुन्हा एकदा स्पष्ट केले की पाकिस्तान सोबतच्या युद्धविरामात कोणत्याही तिसऱ्या पक्षाची भूमिका नव्हती. मे महिन्यात झालेल्या ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानच्या लष्करानेच भारताकडे थेट युद्धविरामाची याचना केली होती. त्यामुळे नवी दिल्ली व इस्लामाबाद यांच्यातील प्रश्नात कोणत्याही तिसऱ्या पक्षाच्या मध्यस्थीची आवश्यकता नसल्याचे भारताने ठणकावून सांगितले.
भारताच्या कायमस्वरूपी फर्स्ट सेक्रेटरी पेतल गहलोत यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या वक्तव्याला उत्तर देताना म्हटले, “या सभेत सकाळी पाकिस्तानचे पंतप्रधान पुन्हा एकदा दहशतवादाला समर्थन देत उभे राहिले. त्यांच्या परराष्ट्र धोरणाचा तो गाभाच आहे.” Operation Sindoor
शरीफ यांनी महासभेत म्हटले होते की पाकिस्तान भारतासोबत सर्वसमावेशक व परिणामकारक संवाद” साधण्यास तयार आहे. त्यांनी जम्मू-काश्मीरच्या परिस्थितीवर टीका केली आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यस्थीमुळे युद्ध टळले, असा दावा केला. इतकेच नव्हे तर पाकिस्तानने ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कारासाठी नामांकन दिल्याचेही शरीफ यांनी सांगितले.
परंतु भारताने हा दावा फेटाळला. गहलोत म्हणाल्या की, 10 मे रोजी झालेला युद्धविराम हा थेट लष्करी चर्चेतूनच साध्य झाला. कोणत्याही तिसऱ्या पक्षाची गरज नव्हती. पाकिस्तानच्या लष्करानेच युद्धविरामासाठी आमच्याकडे विनंती केली,” Operation Sindoor
मे 2025 मध्ये काश्मीरच्या पहलगाम येथे दहशतवाद्यांनी पर्यटकांवर अंधाधुंद गोळीबार केला होता. या हल्ल्यात 26 जणांचा बळी गेला. त्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने ऑपरेशन सिंदूर राबवले. पाकिस्तानकडून शस्त्रसंधीच्या विनंतीनंतर अखेरीस 10 मे रोजी युद्धविराम जाहीर झाला.
ट्रम्प यांनी त्या दिवशी सोशल मीडियावर युद्धविरामाचा श्रेय स्वतःला देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र भारताने स्पष्ट केले की हे समजूतदारपणाने व लष्करी चर्चेतून साधलेले पाऊल होते. Operation Sindoor
Pakistan itself requested a ceasefire after ‘Operation Sindoor’, India rebuked it at the UN
महत्वाच्या बातम्या
- भारतासारख्या हिंदूराष्ट्रात I love Mahadev हेच उद्गार चालणार; नितेश राणेंचा एल्गार
- Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट, महाराष्ट्रातील पूरग्रस्तांसाठी मागितली केंद्राकडून मदत
- Supreme Court : सुप्रीम कोर्टाने म्हटले- न्यायालयांनी गंभीर प्रकरणांची दररोज सुनावणी करावी; आरोपपत्र दाखल केल्यानंतर 2 महिन्यांच्या आत बलात्कार प्रकरणांची सुनावणी पूर्ण करा
- Sonam Wangchuk : लेह हिंसाचारासाठी जबाबदार धरत सोनम वांगचुक यांना अटक