विशेष प्रतिनिधी
मुंबई : शेतकरी बोलायला उभा राहिला, तेव्हा तुम्ही त्यांचे तोंड बंद करता. हक्काची मागणी करणे हे राजकारण आहे का? असा प्रश्न शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिवृष्टीची पाहणी करण्यासाठी मंत्र्यांना थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाण्याचे आदेश दिले होते. यावेळी मागणी करणारे शेतकऱ्यांना राजकारण करू नका असे सुनावल्याचा आरोप राऊत यांनी केला.
महाराष्ट्रातील शेतकरी कर्जमुक्तीचा प्रश्न विचारत आहेत. हे राजकारण आहे का? असा प्रश्नही राऊत यांनी विचारला. भ्रष्टाचार मुक्तीच्या गोष्टी करणाऱ्या फडणवीस यांच्या आजूबाजूला सर्व भ्रष्टाचारी बसले आहेत. त्या भ्रष्टाचाऱ्यांचे खिसे झटकले तरी किमान 50 हजार कोटी रुपये कॅबिनेट मधूनच खाली पडतील.
देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदी यांच्यात तासभर चर्चा झाली काय किंवा एक मिनिटात चर्चा झाली काय. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची कर्जमुक्ती व्हावी, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये मिळावेत, तसेच ज्यांची घरे-दारे वाहून गेली आहेत, ती उभे करून द्यावी, हीच आमची मागणी आहे. यात राजकारण कुठे? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. देवेंद्र फडणवीस विरोधी पक्ष नेते असताना त्यांनी अशा परिस्थितीत काय मागणी केली होती? ते त्यांनीच पुन्हा एकदा ऐकावे.
भारतीय जनता पक्षाच्या एखादा विषय अंगलट आला तर तो विषय दुसऱ्या टोकाला नेतात. हा भाजपचा प्रॉब्लेमच आहे. वास्तविक हा विषय मराठवाड्यातील शेतकऱ्यांचा आहे. त्यामुळे कोविडमध्ये काय झाले? हा प्रश्न आता कोणी विचारला आहे का? कोविड मध्ये महाराष्ट्र इतकी सुव्यवस्था, सुरक्षा कोणत्याच राज्यात नव्हती. तेव्हा उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होते. हे आताच्या पोपटांना कळायला हवे.
देवेंद्र फडणवीस यांनी वर्तमान काळाबद्दल बोलावे. तुम्ही भूतकाळ कशाला उकरून काढता? भविष्यावर बोला, अशा शब्दात संजय राऊत यांनी आपला संताप व्यक्त केला आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना पीएम केअर सारखा फंड तयार करण्यात आला होता. त्यातील एक रुपया देखील खर्च करता आला नसून त्यात 600 कोटी रुपये पडून असल्याचा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. यावरुन राऊत यांनी पलटवार केला आहे.
Is it politics for a farmer to demand his rights? Sanjay Raut questions
महत्वाच्या बातम्या
- Dhananjay Munde : मुंडे म्हणाले तसं, बंजारा आणि वंजारी एकच आहेत का?
- Jan Arogya Yojana : जनआरोग्य योजनेत आता २,३९९ आजारांवर उपचार, मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत निर्णय
- Nana Patole : महाराष्ट्र कर्जबाजारी, सरकारने श्वेतपत्रिका काढण्याची नाना पटाेले यांची मागणी
- एनकाउन्टरच्या भीतीने बंडू आंदेकरचा मुलगा कृष्णा पाेलीसांना शरण!