OBC Maha Elgar बीडमध्ये ओबीसी महाएल्गार मेळावा; चळवळीत मात्र अंतर्गत मतभेद!

OBC Maha Elgar बीडमध्ये ओबीसी महाएल्गार मेळावा; चळवळीत मात्र अंतर्गत मतभेद!

OBC Maha Elgar

विशेष प्रतिनिधी 

बीड : OBC Maha Elgar गणेशोत्सवादरम्यान मराठा आंदोलकांनी राज्यात चांगलाच धुमाकूळ घातला होता. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावे या त्यांच्या मागणीने त्यांनी सरकारच्या नाकीनऊ आणले होते. त्यामुळे सरकारने काही दिवसातच त्यासंबंधी एक जीआर काढत आरक्षणासंदर्भात पाऊलं उचलायला सुरुवात केली. मात्र या जीआरमुळे ओबीसी समाजात मात्र तीव्र असंतोष पाहायला मिळाला.



सरकारने काढलेल्या जीआर विरोधात ओबीसी समाजाने आंदोलन करण्याचा इशारा देखील दिला. यासंदर्भात अनेक ओबीसी नेत्यांनी उघड उघड नाराजी देखील व्यक्त केली. याचाच भाग म्हणून बीड जिल्ह्यातील छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणावर ओबीसी समाजाचा महा एल्गार मेळावा होणार आहे. सध्या या मेळाव्याची जोरदार तयारी चालू आहे.

या मेळाव्यात मंत्री छगन भुजबळ यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. राज्यातील ओबीसी समाजाच्या विविध प्रश्नांवर या मेळाव्यात चर्चा केली जाईल. या मेळाव्यात ओबीसी बांधव मोठ्या प्रमाणात सहभागी होणार आहेत. सोबतच पंकजा मुंडे, धनंजय मुंडे, गोपीचंद पडळकर, जयदत्त क्षीरसागर यांसह राज्यातील अनेक दिग्गज नेत्यांना देखील यासाठी निमंत्रण देण्यात आली आहे. बीड सह मराठवाडा, विदर्भ पश्चिम महाराष्ट्रातून देखील हजारो ओबीसी बांध या मेळाव्यासाठी दाखल होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. OBC Maha Elgar

या मेळाव्या संदर्भात राज्यभरात ओबीसी समाजाकडून मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी केली जात आहे. विविध चौकात, रस्त्यांवर तर सार्वजनिक ठिकाणी देखील हे बॅनर्स झळकत आहेत. या बॅनर वर अनेक ओबीसी नेत्यांचे फोटो देखील दिसत आहेत. मात्र, ओबीसी चळवळीत सातत्याने सक्रिय असलेले आणि सतत समाजासाठी आवाज उठवणारे लक्ष्मण हाके यांचा फोटो मात्र एकाही बॅनरवर दिसत नाही. या घटनेमुळे विविध चर्चांना उधाण आले आहे. हाके यांना जाणून बुजून वगळण्यात आले आहे की यामागे अन्य काही कारण आहे असा सवाल उपस्थित होत आहे.

ओबीसी समाजाच्या विविध आंदोलनांमध्ये कायमच एक सक्रिय भूमिका बजावणारे आणि समाजासाठी कायम आवाज उठवणारे लक्ष्मण हाके यांना महत्त्वाच्या बॅनर्स वरून वगळल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे वारे वाहत आहेत. या संदर्भात हाके यांनी स्वतः देखील एक फेसबुक पोस्ट करत त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. या संबंधी ओबीसी मेळाव्यानंतर मी माझी भूमिका जाहीर करेल असे त्यांनी लिहिले आहे. यामुळे हाके हे चळवळीतून बाहेर पडण्याचे संकेत देत नाहीत ना? अशी चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू आहे. जरी हाके यांनी आपली नाराजी उघडपणे स्पष्ट केली नसली तरी त्यांच्या या पोस्टमुळे मात्र मोठ्या प्रमाणात संभ्रम निर्माण होत आहे. OBC Maha Elgar

हा मेळावा आता ओबीसी समाजासाठी अत्यंत महत्वाचा मानला जात आहे. अनेक दिग्गज नेते या मेळाव्याला उपस्थित राहून समाजाला संबोधित करणार आहेत. त्यामुळे हा मेळावा जितका समाजातील लोकांसाठी महत्त्वाचा आहे, तितकाच आगमी निवडणुकांच्या दृष्टीने दिग्गज नेत्यांसाठी देखील महत्वाचा आहे. आगामी काळात येणाऱ्या निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी करण्यास नेत्यांना या मेळाव्याची मदत होईल हे निश्चित. OBC Maha Elgar

OBC Maha Elgar rally in Beed; However, there are internal differences within the movement!

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023