विशेष प्रतिनिधी
धुळे : Dhule Police : राज्यात ओल्या दुष्काळाची परिस्थिती गंभीर असताना धुळे पोलिसांनी सामाजिक भान दाखवत जनतेसमोर एक आदर्श ठेवला आहे. पारंपरिक पद्धतीने गुलाबाचे फूल देऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वागत करण्याऐवजी, धुळे जिल्ह्यातील ५० पोलिस अधिकाऱ्यांनी आपल्या पगारातून २ लाख रुपयांचा निधी उभारला आणि तो निधी थेट मुख्यमंत्री सहायता निधी (Chief Minister’s Relief Fund) मध्ये जमा करण्याचा निर्णय घेतला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे हा निधी सुपूर्त करण्यात आला. धुळे जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी हा चेक मुख्यमंत्री यांच्या हस्ते सुपूर्त केला.
सध्याच्या कठीण परिस्थितीत शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांना मदत होण्यासाठी पोलिसांनी दाखवलेले हे संवेदनशील पाऊल कौतुकास्पद ठरत आहे. दुष्काळ निवारणासाठी निधी उभारून पोलिसांनी सामाजिक जबाबदारीची जाणीव प्रकट केली आहे.
Dhule Police’s social awareness, Rs 2 lakhs donated to Chief Minister’s Relief Fund for heavy rain victims
महत्वाच्या बातम्या
- Dhananjay Munde : मुंडे म्हणाले तसं, बंजारा आणि वंजारी एकच आहेत का?
- Jan Arogya Yojana : जनआरोग्य योजनेत आता २,३९९ आजारांवर उपचार, मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत निर्णय
- Nana Patole : महाराष्ट्र कर्जबाजारी, सरकारने श्वेतपत्रिका काढण्याची नाना पटाेले यांची मागणी
- एनकाउन्टरच्या भीतीने बंडू आंदेकरचा मुलगा कृष्णा पाेलीसांना शरण!