Ajit Pawar : आवक केलेल्या नेत्यांची मोळी बांधून पक्षाची ताकद वाढवण्यासाठी अजित पवारांचे प्रयत्न

Ajit Pawar : आवक केलेल्या नेत्यांची मोळी बांधून पक्षाची ताकद वाढवण्यासाठी अजित पवारांचे प्रयत्न

Ajit Pawar

विशेष प्रतिनिधी

पुणे : Ajit Pawar :  स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी आता फारच कमी काळ उरला आहे. त्यामुळे राजकीय हालचालींना वेग आला आहे. पक्षाची संघटना मजबूत करण्यासाठी आणि विजय खेचून आणण्यासाठी सर्व राजकीय पक्ष आपली ताकद पणाला लावताना दिसत आहेत. यात अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून काही नेत्यांची घरवापसी घडवून आणताना, तर काही इतर पक्षांतील नेत्यांना आपल्याकडे घेऊन, नेत्यांची मोळी बांधून पक्षाची संघटना बळकट करण्याचे प्रयत्न होत आहेत. ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये विजय मिळवण्यासाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने जोरदार तयारी सुरू केल्याचे चित्र आहे.



अजित पवार यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात तसेच पुणे जिल्ह्यात अजित पवार कमालीचे सक्रिय झाले आहेत. मागील आठवड्यात त्यांनी पिंपरी-चिंचवड शहरात तळ ठोकून राष्ट्रवादी परिवार संमेलन आणि जनसंवाद कार्यक्रम आयोजित करून शहर पिंजून काढले. पुणे शहरात तर अजित पवार पहाटेच्या दौऱ्यांद्वारे सक्रिय असल्याचे दिसून येते. याचबरोबर, पुणे जिल्ह्यातील ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या दृष्टिकोनातूनही अजित पवार राजकीय बेरीज करताना दिसत आहेत. भाजपा, काँग्रेस, शिवसेना आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेत्यांचा पक्षात प्रवेश घडवून आणत अजित पवार पक्षाची संघटना मजबूत करत आहेत.

काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे माजी आमदार महादेव बाबर यांचा पक्षप्रवेश घडवून अजित पवार यांनी हडपसर भागात पक्षाला बळकटी आणली. आता भाजपमध्ये गेलेले जालिंदर कामठे यांची घरवापसी घडवून हडपसर भागात तसेच पुरंदर तालुक्यात राष्ट्रवादीला बळ दिले आहे. काँग्रेसमधून भाजपात गेलेले माजी आमदार संजय जगताप आणि विजय शिवतारे यासारख्या आक्रमक विरोधकांना तोंड देण्यासाठी जालिंदर कामठे यांच्या रूपाने अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला एक आक्रमक चेहरा मिळाला आहे.

इंदापूर तालुक्यातील मुरलीधर निंबाळकर यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशामुळे भवानीनगर परिसरात पक्षाला आणखी बळकटी मिळाली आहे. या पक्षप्रवेशाचा फायदा आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांत राष्ट्रवादीला होऊ शकतो. तसेच, रोहन सुरवसे हे काँग्रेसमध्ये असताना पुणे शहर काँग्रेसचे सरचिटणीस होते. पुणे शहरात त्यांचा बऱ्यापैकी प्रभाव आहे. त्यांच्या पक्षप्रवेशाचा फायदा अजित पवार यांना होईल, असे बोलले जात आहे. याबरोबरच रोहन सुरवसे, मारुती किंडरे आणि स्वाती चिटणीस यांचाही अजित पवार यांच्या राष्ट्रवादी गटात पक्षप्रवेश झाला आहे.

अशा प्रकारे, अजित पवार यांनी नेत्यांचे पक्षप्रवेश घडवून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या दृष्टिकोनातून मतांची गोळाबेरीज करण्यास सुरुवात केली आहे. अजित पवार यांच्या या प्रयत्नांना किती यश मिळेल? त्यांनी टाकलेला हा डाव यशस्वी होईल की नाही, हे येणाऱ्या निवडणुकांच्या निकालांतून स्पष्ट होईल.

Ajit Pawar’s efforts to increase the party’s strength by building a network of incoming leaders

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023