विशेष प्रतिनिधी
बीड : Heavy rains मराठवाड्यामध्ये पावसाने पुन्हा एकदा जोर पकडला आहे. गेल्या काही दिवसांपासून मराठवाडा परिसरात पुर परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र गेले दोन दिवस पावसाने मराठवाड्यातील लोकांना जरा विश्रांती दिली होती. मात्र, आता पावसाने पुन्हा एकदा त्याचा जोर दाखवला आहे.
मध्यरात्रीपासूनच पावसाने चांगलाच जोर धरायला सुरुवात केली. नांदेड, लातूर, बीड, हिंगोली, आणि धाराशिव जिल्ह्यासाठी हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. या भागात हवामान विभागाने मुसळधार ते अतीमुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. दरम्यान या भागातील शाळांना सुट्टी देखील जाहीर करण्यात आली आहे.
गेल्या २४ तासांत एकूण नऊ मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये लातूर जिल्ह्यात सर्वाधिक २५.३ मिलीमीटर इतका पाऊस झाला तर, नांदेडमध्ये १६.९ मिलीमीटर, धाराशिवमध्ये ११.२ मिलीमीटर, परभणीत ९.९ मिलीमीटर, बीडमध्ये ५.४ मिलीमीटर, हिंगोलीत ३.१ मिलीमीटर तर संभाजी नगरमध्ये २.२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. Heavy rains
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार २७ व २८ सप्टेंबर रोजी नांदेड जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस होणार असून धारशिव, बीड, लातूर आणि हिंगोली जिल्ह्यांनाही मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून बचाव आणि मदतकार्य वेगाने सुरू आहे.
कोणत्या जिल्ह्यात काय परिस्थिती ?
धारशिव जिल्ह्यात आज सकाळपासूनच ५० हजार क्युसेकचा विसर्ग वाढवून ५५ हजार ४४० क्युसेक इतका करण्यात आला आहे. त्यामुळे सिना नदीच्या दोन्ही तीरांवरील शेतकरी व नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा प्रशासनाने केला आहे. Heavy rains
हिंगोली जिल्ह्यात देखील शुक्रवारी रात्रीपासूनच पावसाचा जोर वाढला होता. सेनगाव आणि औंढा नागनाथ तालुक्यातील काही गावांमध्ये पावसाचे प्रमाण कमी आहे. मात्र वसमत, कमळनुरी, हिंगोली तालुक्यात ढगफुटी सदृश पाऊस झाला आहे.
नांदेड शहरातील गोदावरी नदीवरील जुना पूल धोक्याच्या पातळीवर आहे. तर जायकवाडी धरणातून विसर्ग कायम असल्याने परिसरातील इतर नद्या देखील धोक्याच्या पातळीवर आहेत. Heavy rains
दरम्यान, रायगड जिल्हा आणि पुणे घाट परिसर देखील उद्यासाठी रेड अलर्ट वर आहे. पालघर, ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक आणि छत्रपती सांभाजीनगर या जिल्ह्यांसह सातारा घाट व कोल्हापूर घाट परिसरात देखील ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. Heavy rains
एकूणच राज्यातील अनेक भागात कमी कालावधीत जास्त प्रमाणात पाऊस झाल्यामुळे नदी-नाल्यांना पूर आला आहे. अनेक गावांना पुराने वेढा घातल्याने तेथील संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. यादरम्यान शासकीय यंत्रणा जरी पूर्ण क्षमतेने कार्यरत असली तरी साधनसामग्रीच्या कमतरतेमुळे नागरिकांच्या अडचणीत मात्र भर पडत आहे. घरांची पडझड, रस्त्यांची हानी आणि शेतीचे प्रचंड नुकसान यामुळे ग्रामीण भागात संकटकालीन परिस्थिती निर्माण झाली आहे.
सततच्या पावसामुळे आता मराठवाड्याचे अर्थचक्र ठप्प होण्याच्या मार्गावर असून शेतकऱ्यांच्या हातचे पीक वाहून गेल्याने त्यांच्यावर आर्थिक संकट कोसळले आहे. सध्या शासनाकडून पूरग्रस्तांसाठी तात्पुरत्या निवाऱ्याची सोय करण्यात आली असली तरी दीर्घकालीन पुनर्वसनासाठी शासनाने अजूनही ठोस पावले उचलणे आवश्यक आहे. Heavy rains
Heavy rains in the state once again; What is the situation in which district?
महत्वाच्या बातम्या
- भारतासारख्या हिंदूराष्ट्रात I love Mahadev हेच उद्गार चालणार; नितेश राणेंचा एल्गार
- Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट, महाराष्ट्रातील पूरग्रस्तांसाठी मागितली केंद्राकडून मदत
- Supreme Court : सुप्रीम कोर्टाने म्हटले- न्यायालयांनी गंभीर प्रकरणांची दररोज सुनावणी करावी; आरोपपत्र दाखल केल्यानंतर 2 महिन्यांच्या आत बलात्कार प्रकरणांची सुनावणी पूर्ण करा
- Sonam Wangchuk : लेह हिंसाचारासाठी जबाबदार धरत सोनम वांगचुक यांना अटक