विशेष प्रतिनिधी
मुंबई : नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन बुधवारी पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी दि. बा. पाटील यांचा गाैरवपर उल्लेखही केला. मात्र, या विमानतळावरून काडी टाकण्याचा केविलवाणा प्रयत्न शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्याकडून सुरू आहे. विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्यास भाजपचा विराेध असून पंतप्रधान नरेंद्र माेदी यांचे नाव देण्यावर एकमत झाल्याची लाेणकढी थाप त्यांनी मारली आहे. नरेंद्र मोदी यांचे नाव द्यावे ही गौतम अदानींचीही मागणी आहे, असेही ते म्हणाले.
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील नाव द्यावे असा कॅबिनेट प्रस्ताव करून केंद्र सरकारला पाठवला होता. दि. बा. पाटील हे नाव मिळेल अशी अपेक्षा होती. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केलेल्या विमानतळाला नाव काय दिलंय? दि.बा पाटील यांच्या नावाला भारतीय जनता पार्टीत विरोध आहे. इतक्या मोठ्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा.पाटील नाव ठेवण्याची गरज काय असा प्रश्न भाजपात उपस्थित केला जात आहे, असा दावा राऊत यांनी केला.
संजय राऊत म्हणाले की, नवी मुंबई विमानतळाला दि.बा. पाटील यांचं नाव देण्यास गौतम अदानींनीही विरोध केला. या विमानतळाला नरेंद्र मोदी आंतरराष्ट्रीय विमानतळ नाव द्यावे अशी भाजपात चर्चा आणि मागणी सुरू झाली आहे. आता मोदींचं नाव कसं देणार हा प्रश्न काहींना पडेल. परंतु गुजरातमध्ये जगातील सर्वात मोठं स्टेडियम जे वल्लभभाई पटेल यांच्या नावाने सुरू होणार होते. त्याचे नामांतर जिवंतपणीच नरेंद्र मोदी यांच्या नावाने झाले.
त्याचप्रमाणे सर्वात मोठ्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला नरेंद्र मोदी यांचं नाव द्यावे यावर भाजपात एकमत झालं आहे असं त्यांनी म्हटलं.तसेच नरेंद्र मोदी यांचे नाव द्यावे ही गौतम अदानींचीही मागणी आहे. त्यामुळे काल विमानतळाचं उद्घाटन झाले ते दि.बा.पाटील यांचं नाव न घेता झाले. दि.बा पाटील यांच्या नावाला गौतम अदानी यांचा ठाम विरोध आहे. हीच भूमिका भाजपाची आहे. मी १०० टक्के दाव्याने ही माहिती देतोय.
नरेंद्र मोदी आंतरराष्ट्रीय विमानतळ या नावाने हे विमानतळ ओळखले जावे यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. अदानी आणि भाजपाच्या प्रमुख लोकांच्या याबाबत बैठका झाल्या आहेत. तसा प्रस्तावही तयार करण्यात येत आहे असं संजय राऊत यांनी सांगितले.दरम्यान, भाजपाच्या निमंत्रण पत्रिका खासगी आहेत. त्या स्थानिक भाजपाच्या होत्या. परंतु मी जे बोलतोय ती राष्ट्रीय पातळीवरील चर्चा आहे. मुंबई, महाराष्ट्र आणि देशातील सर्वात मोठं आंतरराष्ट्रीय विमानतळ नरेंद्र मोदी यांच्या नावाने ओळखले जावे असं भाजपातील नेत्यांची इच्छा आहे.
भूमिपुत्र दि. बा.पाटील यांच्या नावाने हे विमानतळ मंजूर झाले आहे. त्यांच्या नावानेच हे विमानतळ ओळखले जावे. दि. बा. पाटील यांचेच नाव विमानतळाला मिळावा ही आमची भूमिका आहे. दि.बा. पाटील यांच्या नावाचा प्रस्ताव केंद्राला पाठवला आहे. त्यावर पंतप्रधान सकारात्मक आहे असं भाजपा म्हणतंय, परंतु गुजरातमधील स्टेडियमलाही माझे नाव देऊ नका असं मोदी म्हणत होते. परंतु नरेंद्र मोदी यांचं नाव दिले त्यानंतर ते उद्घाटनाला आले होते. त्यामुळे त्यांच्यावर फार विश्वास ठेवू नका असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला.
Sanjay Raut Tries to Stoke Controversy
महत्वाच्या बातम्या
- Vijay Vadettiwar : काॅंग्रेसवर टीका करणाऱ्या जरांगे पाटील यांचा बोलवता धनी कोण? विजय वडेट्टीवार यांचा सवाल
- Devendra Fadnavis : शेतकऱ्याला पुन्हा उभे करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून माेठ्या पॅकेजची घाेषणा
- नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे पुणेकरांसाठी नव्या संधींचे द्वार , मुरलीधर मोहोळ यांचे प्रतिपादन
- बनावट पासपोर्ट प्रकरणी नीलेश घायवळसह काढून देण्यासाठी मदत करणाऱ्या दोघांविरुद्धही गुन्हा