विशेष प्रतिनिधी
मुंबई : कुख्यात गॅंगस्टर निलेश घायवळ याचा भाऊ सचिन घायवळ याला शस्त्र परवाना दिल्याच्या प्रकरणात आता नवा ट्विस्ट आला आहे. परवाना देण्याचा निर्णय गृहराज्य मंत्री याेगेश कदम यांचा नव्हता तर उच्च आसनावरील एका बड्या व्यक्तीने सूचना केली हाेती, असा दावा त्यांचे वडील आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी केला आहे. त्यामुळे ही बडी व्यक्ती काेण असा प्रश्न निर्माण झाला आहे. Ramdas Kadam
रामदास कदम म्हणाले या व्यक्तीचे नाव योगेश कदम यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले आहे. त्या व्यक्तीने शिफारस केल्यामुळेच सदर व्यक्ती स्वच्छ असेल असे मानून त्यांनी यासंबंधीचा निर्णय घेतला,
राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी गँगस्टर गुंड नीलेश घायवळचा भाऊ सचिन बन्सीलाल घायवळ याला शस्त्र परवाना दिल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अनिल परब यांनी केला आहे. या प्रकरणी त्यांनी योगेश कदम यांना मुख्यमंत्र्यांचे अभय असल्याचाही आरोप केला आहे. मुख्यमंत्र्यांचे अभय असल्यामुळेच कदम यांनी राज्यात ‘थैमान’ घातले आहे. त्यांनी पुण्यातील एका कुख्यात गुंडाच्या भावाला, ज्याच्यावर खून आणि खंडणीचे गुन्हे दाखल होते, त्याला शस्त्र परवाना मंजूर केला आहे. त्यामुळे त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली जावी, अशी मागणी परब यांनी केली आहे. Ramdas Kadam
अनिल परब यांच्या या आरोपांनंतर काही वेळातच योगेश कदम यांचे वडील माजी मंत्री रामदास कदम यांनी पत्रकारांशी बाेलताना योगेश कदम यांनी एका बड्या व्यक्तीच्या सूचनेनुसार हा परवाना देण्यासंबंधीचा निर्णय घेतला असे स्पष्ट केले. ते म्हणाले, योगेश कदम राज्याचे गृहराज्यमंत्री आहेत. मंत्री म्हणून त्यांना काही अधिकार असतात. एखाद्यावर एकही केस नाही, असे त्यांचे समाधान झाले आणि संबंधित शिक्षक किंवा बिल्डर असेल अथवा कोर्टाने त्याला क्लीनचिट दिली असेल, तर गृहराज्यमंत्री निर्णय घेऊ शकतो. ते तुला म्हणजे अनिल परब व तुझ्या बापाला विचारून निर्णय घेणार नाहीत.
योगेश कदम यांनी विधिमंडळातील एका बड्या व्यक्तीच्या सूचनेनुसार हा निर्णय घेतला. हा व्यक्ती मंत्र्यांनाही आदेश देतो. हा व्यक्तीही न्यायाधीशच आहे. त्यामुळे योगेश कदम यांनी निर्णय घेतला. त्यांनी त्या व्यक्तीचे नाव मुख्यमंत्र्यांनाही सांगितले आहे. ती मोठी व्यक्ती आहे. उच्च आसनावर बसलेली व्यक्ती आहे. अशा व्यक्तीने सांगितल्यानंतर, त्याने शिफारस केल्यानंतर, त्याच्या दृष्टीने ही व्यक्ती स्वच्छ असेल असे वाटून त्यांनी हा निर्णय घेतला, असे रामदास कदम म्हणाले.
रामदास कदम म्हणाले, , योगेश कदम यांना आजपासून नव्हे तर मागील 2-3 वर्षांपासून सातत्याने टार्गेट केले जात आहे. तरीही ते त्यांच्या नाकावर टिच्चून निवडून आले. त्यानंतर त्यांना पुन्हा 4-5 खात्यांचा कारभार मिळाला. त्यामुळे यांचा पोटशुळ उठला आहे. आम्ही त्यांना संपवण्याचा प्रयत्न करतो, पण तरीही त्यांना 4-5 खाती मिळतात हे त्यांचे खरे दुखणे आहे. अनिल परब यांनी विधिमंडळात एक फोटो दाखवून हा योगेश कदम यांचा पार्टनर असल्याचा दावा केला. त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. त्यावर योगेश यांनी खुलासा केला. त्यांनी वाळू उपशाची न्यायालयीन ऑर्डर दाखवली.
रामदास कदम म्हणाले, अनिल परब यांनी आत्तापर्यंत जे – जे आरोप केले. विधिमंडळात सातबाऱ्याचा उतारा दाखवला. इथे धाड टाकल्याचा आरोप केला. माझ्या पत्नीच्या नावावर बार आहे, डान्सबार नाही. पण त्यानंतरही हेतुपुरस्सर महाराष्ट्रात आमची बदनामी करण्यासाठी लेकीबाळींना नाचवून पैसा खात आहेत असा आरोप केला जात आहे. हा बार 35 वर्षांपासून सुरू होता. मी त्याचे दस्तऐवज सादर केलेत. हा बार शेट्टी नामक व्यक्ती चालवत आहे. त्याच्याकडे त्याचा परवानाही आहे. आम्ही एवढ्या खालच्या पातळीला जाणार नाही.
आम्ही आमच्या आयुष्यात काळे आणि खोटे धंदे केले नाहीत. बाळासाहेब ठाकरे यांना आम्ही दैवत मानतो. त्यामुळे आम्ही त्यांची बदनामी होईल असे काहीही करणार नाही. त्यांच्याविषयी घाणेरडे विचार आमच्या डोक्यातही येत नाहीत, असेही रामदास कदम म्हणाले.
Ramdas Kadam’s statement in the assault weapons license case gives a twist
महत्वाच्या बातम्या
- Vijay Vadettiwar : काॅंग्रेसवर टीका करणाऱ्या जरांगे पाटील यांचा बोलवता धनी कोण? विजय वडेट्टीवार यांचा सवाल
- Devendra Fadnavis : शेतकऱ्याला पुन्हा उभे करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून माेठ्या पॅकेजची घाेषणा
- नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे पुणेकरांसाठी नव्या संधींचे द्वार , मुरलीधर मोहोळ यांचे प्रतिपादन
- बनावट पासपोर्ट प्रकरणी नीलेश घायवळसह काढून देण्यासाठी मदत करणाऱ्या दोघांविरुद्धही गुन्हा