विशेष प्रतिनिधी
सांगली : jayant patil भारतीय जनता पक्षाचे आमदार गाेपीचंद पडळकर यांच्या विरुध्दचा वाद राष्ट्रवादी काॅंग्रेसचे आमदार जयंत पाटील यांना चांगला भाेवला आहे. पडळकर आणि आमदार सदाभाऊ खाेत यांनी केलेल्या तक्रारीनंतर सांगली जिल्हा बँकेच्या नोकर भरतीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांन तत्काळ स्थगिती देत नव्याने नोकर भरती प्रक्रिया राबवण्याचे निर्देश दिले आहेत.jayant patil
सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या 559 जागांच्या नोकरभरतीला राज्य सरकारने स्थगिती दिली आहे. भरती प्रक्रिया आता आयबीपीएस IBPS किंवा टीसीएस या राष्ट्रीय संस्थांमार्फत करण्याचे आदेश देण्यात आले. IBPS ((इंडियन बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन) किंवा TCS (टाटा कन्सलटन्सी सव्हीसेस) यापैकी कोणत्याही एका कंपनीची निवड करण्याबाबत देखील बँकेस राज्य सरकारने आदेश दिले आहेत, अशी माहिती आमदार सदाभाऊ खोत यांनी दिली. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेतील आधीच्या नोकरभरती आणि घोटाळ्याची चौकशी सुरु असतानाच नवीन 561 जणांच्या नोकरभरतीला परवानगी दिल्याने सहकार मंत्री याबाबत बेजबाबदारपणे वागले असेही ते म्हणाले.jayant patil
सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेतील नोकरभरती पारदर्शक होण्यासाठी आमदार सदाभाऊ खोत आणि आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. राज्यातील सर्व सहकारी बँकेतील भरतीसाठी आयबीपीएस व टीसीएस या संस्थाद्वारे भरती प्रक्रिया राबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याबाबत सहकार विभागाच्या अवर सचिव मंजुषा साळवी यांनी सहकार आयुक्त पुणे यांना आदेश काढले असल्याची यांनी सांगितले.
एका लिपीक उमेदवारासाठी 20 ते 25 लाख व शिपाई उमेदवारासाठी 12 ते 15 लाख रुपये दर असल्याची चर्चा सुरु आहे. यापूर्वी सन 2011 मध्ये केलेल्या नोकर भरतीत प्रचंड गैरव्यवहार झाला असून, त्याची चौकशी पूर्ण झाली आहे. अशा परिस्थितीत नोकर भरतीत पात्र व योग्य उमेदवार येणे आवश्यक आहे. बँकेच्या संचालकांच्या शिफारशीनुसार होऊ नये, ही देखील मागणी केल्याचे खाेत यांनी सांगितले.
सांगली जिल्ह्यात सध्या गाेपीचंद पडळकर आणि जयंत पाटील यांच्यात जाेरदार वाद सुरू आहे. नुकताच भारतीय जनता पक्षाचा सांगलीत मेळावा झाला हाेता. यावेळी जयंत पाटील यांचा जिल्हा बॅंकेतील भ्रष्टाचार बाहेर काढू असा इशारा पडळकर तसेच उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिला हाेता.
Big Blow to Jayant Patil as Sangli District Bank Recruitment Put on Hold
महत्वाच्या बातम्या
- Vijay Vadettiwar : काॅंग्रेसवर टीका करणाऱ्या जरांगे पाटील यांचा बोलवता धनी कोण? विजय वडेट्टीवार यांचा सवाल
- Devendra Fadnavis : शेतकऱ्याला पुन्हा उभे करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून माेठ्या पॅकेजची घाेषणा
- नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे पुणेकरांसाठी नव्या संधींचे द्वार , मुरलीधर मोहोळ यांचे प्रतिपादन
- बनावट पासपोर्ट प्रकरणी नीलेश घायवळसह काढून देण्यासाठी मदत करणाऱ्या दोघांविरुद्धही गुन्हा