विशेष प्रतिनिधी
छत्रपती संभाजी नगर : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक आम्हाला महायुती म्हणूनच लढवाय आहे. पण काहीजण आमच्याशी छळ कपट करत आहेत. जे लोक आमचा छळकपट करत आहेत. त्यांना रोखण्याची गरज आहे, असा निशाणा राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी युतीतील नेत्यांवर साधला आहे. Sanjay Shirsat
छत्रपती संभाजीनगर येथे शुक्रवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेची एक बैठक झाली. या बैठकीत बोलताना संजय शिरसाट यांनी वरील विधान केले आहे. ते म्हणाले, शिवसेनेला महायुती म्हणूनच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना सामोरे जायचे आहे. महायुतीचा भगवा झेंडा फडकावयाचा आहे. पण काही लोक आमचा छळकपट करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना रोखण्याची गरज आहे. मी इतरांविषयी बोलत नाही. मी महायुतीबद्दलही बोलत नाही. पण आपल्यातीलच काही लोकांना युती होऊ नये असे वाटत आहे. आपण त्यांच्यापासून सावध राहिले पाहिजे, असे ते म्हणाले.
संजय शिरसाट यांच्या या विधानाची जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात उलटसुलूट सुरू झाली. अनेकांनी त्यांचे हे विधान सत्ताधारी भाजपला उद्देशून असल्याचा दावा केला. पण नंतर एका वृत्तवाहिनीशी बोलताना संजय शिरसाट यांनी हे विधान इतर पक्षांतील नेत्यांविषयी नव्हे तर स्वपक्षीयांनाच उद्देशून केल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले, महायुतीत सर्व निवडणुका लढत असताना काही लोकांची युती करायची नाही किंवा युती न करता स्वतःचा स्वार्थ साधण्याची मानसिकता तयार झाली आहे. हा त्यांच्यासाठी दिलेला इशारा होता. एकनाथ शिंदे यांनी आम्हाला आगामी निवडणूक आपल्याला महायुती म्हणूनच लढण्याचा आदेश दिला आहे. त्यामुळे इतरांनी त्यावर काही बोलणे योग्य नाही. वरिष्ठ नेते निर्णय नेते निर्णय घेत असतात. त्यामुळे खालच्या पातळीवरच्या नेते जे स्टेटमेंट देत आहेत, ते योग्य नाही. त्यामुळे त्यांना इशारा देण्यासाठी आम्ही हे विधान केले. Sanjay Shirsat
यावेळी त्यांना तुमचा रोख नेमका कुणाकडे आहे? असा प्रश्न विचारला असता त्यांनी नाव घेण्यास नकार दिला. नाव घेऊन वादाला तोंड फोडणे हे आत्ताच्या घडीला योग्य ठरणार नाही. पण संबंधितांची तक्रार वरिष्ठांकडे केली जाईल यात शंका नाही, असे संजय शिरसाट म्हणाले.
Want to fight through the Mahayuti but some people are harassing and deceiving them, Sanjay Shirsat’s target
महत्वाच्या बातम्या
- Cooperation Minister, : लोकांना कर्जमाफीचा नाद, सहकार मंत्र्यांच्या असंवेदनशील विधानावर संताप, म्हणण्याचा अर्थ ताे नव्हता असा खुलासा
- Nitesh Rane : एमआयएमच्या नावाखाली हिरव्या सापांची वळवळ, पुन्हा सभा हाेऊ द्यायची का विचार करू, नितेश राणेंचा इशारा
- Ajit Pawar : तुम्हाला पाठीशी घालायला आम्ही मोकळे नाही, गैरप्रकार करणाऱ्यांना अजित पवार यांचा इशारा
- महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन निवडणुकीत रंगणार ‘पवार विरुद्ध मोहोळ’ सामना