विशेष प्रतिनिधी
कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दुर्गापूर येथे घडलेल्या वैद्यकीय विद्यार्थिनीवरील सामूहिक बलात्कार प्रकरणावर केलेल्या वक्तव्यामुळे राज्यात संतापाची लाट उसळली आहे. बॅनर्जी यांनी रविवारी दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटले, “मुलींनी रात्री कॉलेजच्या बाहेर जाणे टाळावे, त्यांनाही स्वतःची काळजी घ्यावी लागेल.” Mamata Banerjee
या विधानामुळे विरोधक आणि महिला हक्क संघटनांनी मुख्यमंत्री बॅनर्जी यांच्यावर ‘पीडितेला दोष देण्याचा’ आरोप केला आहे. दुर्गापूरमधील एका वैद्यकीय विद्यार्थिनीवर झालेल्या सामूहिक बलात्कारानंतर हे वक्तव्य समोर आले असून, राज्यभर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
ही घटना शुक्रवारी (१० ऑक्टोबर) रात्री साडेआठच्या सुमारास दुर्गापूर येथील IQ सिटी मेडिकल कॉलेज हॉस्पिटलजवळील झाडीमध्ये घडली. २० वर्षीय विद्यार्थिनी ही ओडिशातील जलेश्वर येथील रहिवासी असून ती आपल्या मित्रासोबत फिरण्यासाठी बाहेर गेली होती. दोघेही एका अंधाऱ्या रस्त्याने चालत असताना पाच अज्ञात तरुणांनी त्यांना अडवले आणि विद्यार्थिनीवर अत्याचार केला.या गुन्ह्यात पोलिसांनी अपु बौरी (२१), फिरदोस शेख (२३) आणि शेख रेजुद्दीन (३१) या तिघांना अटक केली असून शेख सोफिकुल या आणखी एका संशयिताला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.
या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या, “मुलींनी रात्री कॉलेजच्या बाहेर जाऊ नये, त्यांना स्वतःचे रक्षण करावे लागेल.”
हे विधान समोर येताच विरोधी पक्ष आणि महिला संघटना संतप्त झाल्या. काँग्रेस, भाजप आणि डाव्या पक्षांनी मुख्यमंत्री बॅनर्जी यांच्यावर संवेदनशील प्रकरणावर गैरजबाबदार आणि असंवेदनशील वक्तव्य केल्याचा आरोप केला.
ही पहिली वेळ नाही की ममता बॅनर्जी यांच्यावर अशा प्रकारच्या वक्तव्यांमुळे टीका झाली आहे. २०१२ मधील पार्क स्ट्रीट सामूहिक बलात्कार प्रकरणात, त्यांनी या घटनेला “शाजानो घटना” (बनावटी घटना) म्हणत आरोपींचे समर्थन केले होते. त्या प्रकरणातील पीडिता सुजेट जॉर्डन यांच्यावर बॅनर्जी यांच्या पक्षातील नेत्यांनीच टीका केली होती. २०१३ मध्ये, राज्यातील वाढत्या बलात्कारांच्या प्रकरणांवर विधानसभेत चर्चा होत असताना बॅनर्जी यांनी म्हटले होते की, “लोकसंख्या वाढ आणि मॉल्स-मल्टिप्लेक्समुळे अशा घटना वाढत आहेत.”
महिला संघटनांनी मुख्यमंत्री बॅनर्जी यांना पीडितांऐवजी समाजाला दोष देण्याचे “लज्जास्पद आणि धोकादायक उदाहरण” म्हटले आहे.विरोधकांनी मागणी केली आहे की त्यांनी तातडीने आपले वक्तव्य मागे घ्यावे आणि पीडितेची माफी मागावी.
Mamata Banerjee’s Shocking Remark on Durgapur Rape Case
महत्वाच्या बातम्या
- Cooperation Minister, : लोकांना कर्जमाफीचा नाद, सहकार मंत्र्यांच्या असंवेदनशील विधानावर संताप, म्हणण्याचा अर्थ ताे नव्हता असा खुलासा
- Nitesh Rane : एमआयएमच्या नावाखाली हिरव्या सापांची वळवळ, पुन्हा सभा हाेऊ द्यायची का विचार करू, नितेश राणेंचा इशारा
- Ajit Pawar : तुम्हाला पाठीशी घालायला आम्ही मोकळे नाही, गैरप्रकार करणाऱ्यांना अजित पवार यांचा इशारा
- महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन निवडणुकीत रंगणार ‘पवार विरुद्ध मोहोळ’ सामना