विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : Suresh Gopi केंद्रीय मंत्री आणि भाजप खासदार सुरेश गोपी (Suresh Gopi) यांनी आपला मंत्रीपदाचा राजीनामा देण्याचा विचार व्यक्त केला आहे. त्यांनी सांगितले की, मंत्री झाल्यापासून त्यांचे वैयक्तिक उत्पन्न मोठ्या प्रमाणात घटले असून, त्यामुळे आता पद सोडण्याचा निर्णय घेण्याचा विचार करत आहेत.
केरळमधील सुप्रसिद्ध अभिनेता ते राजकारणी असा प्रवास करणारे सुरेश गोपी (Suresh Gopi) हे सध्या केंद्र सरकारमध्ये राज्य मंत्री (पर्यटन व पेट्रोलियम) म्हणून कार्यरत आहेत. अलीकडच्या एका मुलाखतीत त्यांनी स्पष्टपणे सांगितले की,मंत्री झाल्यापासून माझे चित्रपट आणि कार्यक्रम थांबले आहेत. माझे उत्पन्न जवळपास ९० टक्क्यांनी घटले आहे. मला माझ्या कुटुंबाची जबाबदारी आणि आर्थिक वास्तव लक्षात घ्यावे लागेल.मंत्री झाल्यापासून चित्रपटांच्या ऑफर स्वीकारू शकलो नाही. जाहिराती आणि सांस्कृतिक कार्यक्रमांवरील उत्पन्न बंद झाले आहे.
मी मंत्रिपदाचा आदर करतो, परंतु मी एक कलाकार म्हणून माझ्या व्यावसायिक जीवनाला गमावू शकत नाही. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्ष नेतृत्वाशी याबाबत चर्चा करणार आहे, असेही सुरेश गोपी (Suresh Gopi) यांनी सांगितले.
भाजपच्या केरळ युनिटने गोपींच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की,“सुरेश गोपी पक्षासाठी महत्त्वाचे नेते आहेत. त्यांचे वैयक्तिक प्रश्न आम्ही गांभीर्याने घेऊ. अंतिम निर्णय पक्ष नेतृत्व घेईल.”
http://youtube.com/post/UgkxC-nGPv11BBO_8mLUt3vnK0lxdVuNLmXb?si=M76AYinH5tUwGokf
सुरेश गोपी यांनी गेल्या काही दशकांत दक्षिण भारतीय सिनेमात मोठी लोकप्रियता मिळवली. त्यानंतर ते राज्यसभेवरून संसदेत पोहोचले आणि २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत त्रिशूर मतदारसंघातून विजयी झाले.त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात जरी यशस्वी झाली असली, तरी मंत्रीपदामुळे त्यांच्या अभिनय कारकिर्दीला विराम मिळाला आहे.
Union Minister Suresh Gopi considering resigning; Claims that income has decreased since becoming a minister
महत्वाच्या बातम्या
- Cooperation Minister, : लोकांना कर्जमाफीचा नाद, सहकार मंत्र्यांच्या असंवेदनशील विधानावर संताप, म्हणण्याचा अर्थ ताे नव्हता असा खुलासा
- Nitesh Rane : एमआयएमच्या नावाखाली हिरव्या सापांची वळवळ, पुन्हा सभा हाेऊ द्यायची का विचार करू, नितेश राणेंचा इशारा
- Ajit Pawar : तुम्हाला पाठीशी घालायला आम्ही मोकळे नाही, गैरप्रकार करणाऱ्यांना अजित पवार यांचा इशारा
- महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन निवडणुकीत रंगणार ‘पवार विरुद्ध मोहोळ’ सामना