विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : Supreme Court कर्नाटकात २०२४ मध्ये झालेल्या निवडणुकीदरम्यान बेंगळुरू सेंट्रल मतदारसंघात मोठ्या प्रमाणात मतदार यादीत फेरफार झाल्याचा आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहल गांधी यांनी केला होता. या आरोपांची विशेष तपास पथकाद्वारे (एसआयटी) चौकशी करण्याची मागणी करणारी याचिका सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) फेटाळून लावली.
लोकसभा निवडणुकीदरम्यान बेंगळुरू सेंट्रल मतदारसंघात मोठ्या प्रमाणात मतदार यादीत फेरफार झाल्याप्रकरणी ‘एसआयटी’ चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करणारी याचिका रोहित पांडे यांनी सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) दाखल केली होती.
केंद्रीय निवडणूक आयोगासमोर आधीच निवेदन सादर करण्यात आले असले तरी त्यांच्याकडून अद्याप कोणतीही कारवाई केलेली नाही. असे याचिकाकर्त्याच्या वकिलांनी सांगितले. यावर खंडपीठाने स्पष्ट केले की, निवडणूक आयोगासमोर हा विषय मांडू शकतो. वकिलांनी निवडणूक आयोगाला निर्णय घेण्यासाठी वेळमर्यादा निश्चित करण्याची मागणी केली असली तरी खंडपीठाने असे कोणतेही निर्देश देण्यास नकार दिला.
न्यायालयाच्या निर्देशांचे पालन होईपर्यंत आणि मतदारयाद्यांचे स्वतंत्र ऑडिट पूर्ण होईपर्यंत मतदार यादीत पढील सधारणा किंवा अंतिमीकरण करू नये अशी मागणी याचिकेत करण्यात आली होती.
http://youtube.com/post/Ugkx_LoSRgkg6K5xWyuongVMS-xKxXH96waT?si=2GCq_9HQkIhknqAX
निवडणूक आयोगाकडे अर्थपूर्ण पडताळणी, ऑडिट आणि सार्वजनिक छाननी सक्षम करण्यासाठी सुलभ, मशीन वाचनीय आणि ओसीआर- प्रकाशित करण्याचे निर्देश देण्याची मागणीही करण्यात आली आहे. आम्ही याचिकाकर्त्यांच्या वकिलाचे म्हणणे ऐकले आहे. जनहितार्थ दाखल केलेली ही याचिका आम्ही विचारात घेण्यास इच्छुक नाही. याचिकाकर्ता निवडणूक आयोगासमोर बाजू मांडू शकतो, असे खंडपीठाने आपल्या आदेशात म्हटले आहे.
Supreme Court rejects demand for inquiry into allegations of voter list corruption
महत्वाच्या बातम्या
- Cooperation Minister, : लोकांना कर्जमाफीचा नाद, सहकार मंत्र्यांच्या असंवेदनशील विधानावर संताप, म्हणण्याचा अर्थ ताे नव्हता असा खुलासा
- Nitesh Rane : एमआयएमच्या नावाखाली हिरव्या सापांची वळवळ, पुन्हा सभा हाेऊ द्यायची का विचार करू, नितेश राणेंचा इशारा
- Ajit Pawar : तुम्हाला पाठीशी घालायला आम्ही मोकळे नाही, गैरप्रकार करणाऱ्यांना अजित पवार यांचा इशारा
- महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन निवडणुकीत रंगणार ‘पवार विरुद्ध मोहोळ’ सामना