विशेष प्रतिनिधी
पुणे: कायद्याचे उल्लंघन केल्यास सात पिढ्यांना आठवणीत राहील अशी कारवाई करू असा सज्जड दम पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी गुन्हेगारांस दिला. Amitesh Kumar
रामवाडी येथील पोलीस चौकीच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले,बेकायदेशीर सावकारी व्यवसाय करणारे नागरिकांची घरं लिहून घेत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. असं कोणी करत असेल तर सावकारी व्यवसाय करणाऱ्यांचा भर चौकात सत्कार केला जाईल असा इशारा यांनी दिला. ते
रामवाडी येथे कंटेनर मध्ये पोलीस चौकीचे उद्घाटन करण्यात आले. या भागात पोलीस चौकी व्हावी अशी नागरिकांची मागणी होती. याबाबत शासनाकडे प्रस्ताव पाठवला आहे. हा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे. तोपर्यंत लोकांच्या अडीअडचणी समजून घेऊन तात्पुरत्या स्वरूपात उपलब्ध मनुष्यबळातून काही मनुष्यबळ देऊन तात्पुरत्या स्वरूपात पोलीस चौकी सुरू केली असल्याची माहिती आयुक्तांनी दिली.
पोलिस आयुक्त म्हणाले, “तुमच्या केसाला पण धक्का लागू देणार नाही. प्रथम अवैध धंदा बंद करा, हा परिसर स्वच्छ झाला पाहिजे. जे गुन्हेगार आहेत त्यांची नावं शोधा, त्यांना आणा आणि बसवा. रस्त्यात असलेल्या भंगार व्यवसाय असेल तर तो काढून टाका. फालतू टपरी लावून चालू देणार नाही. घरात मन न लागणारे लोकं आहेत ते थर्ड क्लास आहेत. त्यांना पूर्णपणे स्वच्छ करायला पाहिजे. कारवाई आम्ही अशी करू की सात पिढ्या लक्षात ठेवतील.
अधिकाऱ्यांना सूचना देताना आयुक्त म्हणाले, “लोकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. परिणामकारक सुधारणा घडवून आणायला लागेल. पोलिस अधिकाऱ्यांना सूचना आहे की रामवाडी मधील अवैध धंदे तोडून टाका. मन परिवर्तन करा. नाही तर खाकीच्या भाषेतून त्यांचे मन परिवर्तित करा. एक थेंब अवैध दारू विकू देणार नाही.
बाजीराव रोड येथे झालेल्या अल्पवयीन तरुणाच्या खुनाबद्दल बोलताना पोलीस आयुक्त म्हणाले, या गुन्ह्याचा तपास सध्या सुरू आहे. या घटनेमध्ये आरोपी निष्पन्न करून त्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे. प्रथमदर्शनी ही घटना पूर्वीच्या वादातून घडलेली असल्याचे निदर्शनास आले आहे.
Action for Law Violation Will Be Remembered for Seven Generations, Warns Police Commissioner Amitesh Kumar
महत्वाच्या बातम्या
- महिला डॉक्टरची आत्महत्या नसून संस्थात्मक हत्या, राहुल गांधी यांचा आरोप
- धंगेकर अन्यायविरोधात लढणारा कार्यकर्ता, पण आपल्याला महायुतीत दंगा नको, एकनाथ शिंदे यांची भूमिका
- मुरलीधर मोहोळांनी विशाल गोखलेंसाठी केला पदाचा गैरवापर, १९७ कोटींचा हवाई घोटाळ्याचा रवींद्र धंगेकरांचा आरोप
- पुण्यात जमिनीचा मोठा धिंगाणा, मुरलीधर मोहोळ यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घेण्याची विजय वडेट्टीवार यांची मागणी



















