विशेष प्रतिनिधी
पाटणा: बिहारने पूर्वी ‘जंगलराज’ पाहिला आहे. गुन्हेगारी, भ्रष्टाचार आणि भीतीचे वातावरण त्या काळात सामान्य झाले होते. पण एनडीए सरकारने बिहारला विकासाच्या मार्गावर आणले. आता जनता पुन्हा जुन्या काळात जाणार नाही. ‘जंगलराज’ चालवणाऱ्यांचा यावेळी सर्वात मोठा पराभव होईल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. Narendra Modi
बिहार विधानसभा निवडणुका जसजशा जवळ येत आहेत, तसतसे सर्व पक्ष आपल्या रणनीती अधिक तीव्र करत आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी बिहार भाजपच्या महिला कार्यकर्त्यांशी ‘मेरा बूथ, सबसे मजबूत’ या उपक्रमाअंतर्गत आभासी संवाद साधला. या संवादादरम्यान त्यांनी महिलांना केवळ मतदानात सहभागी होण्याचे नव्हे, तर मतदारांमध्ये जनजागृती करून महिलांचा मतदान टक्का विक्रमी करण्याचे आवाहन केले. Narendra Modi
मोदींनी आपल्या भाषणात स्पष्ट केले की, “महिला मतदार हे राष्ट्राच्या विकासाचे खरे आधारस्तंभ आहेत. एनडीए सरकारने गेल्या दहा वर्षांत महिलांच्या सक्षमीकरणासाठी जे प्रयत्न केले आहेत, त्यांचे फळ बिहारमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. आता या प्रयत्नांना आणखी गती देण्यासाठी महिलांनी मतदानाच्या माध्यमातून लोकशाही बळकट करणे आवश्यक आहे.” Narendra Modi
गेल्या तीन विधानसभा निवडणुकांत महिलांचा सहभाग पुरुषांच्या तुलनेत अधिक राहिला आहे. २०१० मध्ये महिलांचा मतदान टक्का ५४.४९ होता, तर पुरुषांचा ५१.१२. २०१५ मध्ये महिलांचा मतदान टक्का ६०.४८ तर पुरुषांचा ५३.३२ इतका राहिला. २०२० मध्येही महिलांचा मतदान टक्का ५९.६९ तर पुरुषांचा ५४.४५ इतका होता. या पार्श्वभूमीवर मोदींनी महिलांना पुढे येऊन बिहारच्या भवितव्याला दिशा देण्याचे आवाहन केले.
पंतप्रधान मोदींनी पक्षाच्या ‘पन्ना प्रमुख’ प्रणालीचा विशेष उल्लेख केला. त्यांनी सांगितले, “प्रत्येक पन्ना प्रमुखाने आपल्या विभागातील महिलांशी संवाद साधावा, त्यांना मतदानासाठी प्रोत्साहित करावे आणि मतदानाच्या दिवशी त्या महिलांनी प्रथम मतदान करावे याची खात्री करावी.”
पंतप्रधान मोदींनी सरकारच्या महिलांसाठी राबविलेल्या योजनांचा तपशील देत सांगितले की, “उज्ज्वला योजनेमुळे लाखो महिलांना धुरमुक्त स्वयंपाकघर मिळाले. जनधन खात्यांमुळे महिलांचे आर्थिक सक्षमीकरण झाले. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत लाखो महिलांच्या नावावर घरांचे मालकी हक्क देण्यात आले. यामुळे महिलांचा आत्मविश्वास वाढला आहे.”
त्यांनी पुढे सांगितले, “आम्ही बिहारमधील शहरांमध्ये मेट्रो योजना राबवण्याची तयारी करत आहोत, वीज दर कमी करण्याचे काम सुरू आहे, तसेच ग्रामीण भागातील महिलांना उद्योजक बनवण्यासाठी ‘लखपति दीदी’ योजना सुरू करण्यात आली आहे. या सर्व योजना महिलांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवणाऱ्या आहेत.”
मोदींनी म्हणाले, “मी या निवडणुकीकडे बारकाईने पाहिले आहे. बिहारची जनता आता विकास हाच मुद्दा मानते. त्यांनी मनोमन ठरवले आहे की यावेळी एनडीएला प्रचंड बहुमताने सत्तेत आणायचे. मला यात कुठलीही शंका नाही.”
पंतप्रधानांनी भाजपच्या महिला कार्यकर्त्यांचे विशेष कौतुक करत सांगितले, “बिहार भाजपच्या महिला कार्यकर्त्या प्रत्येक गावात, प्रत्येक बूथवर अथक परिश्रम करत आहेत. ‘मेरा बूथ, सबसे मजबूत’ या निर्धाराने त्यांनी संघटनेला बळ दिले आहे. तुमचे कार्य हेच एनडीएच्या विजयाचा पाया आहे.”
Defeat the ‘Jungle Raj’ Rulers with a Historic Mandate, Urges PM Narendra Modi
महत्वाच्या बातम्या
- महिला डॉक्टरची आत्महत्या नसून संस्थात्मक हत्या, राहुल गांधी यांचा आरोप
- धंगेकर अन्यायविरोधात लढणारा कार्यकर्ता, पण आपल्याला महायुतीत दंगा नको, एकनाथ शिंदे यांची भूमिका
- मुरलीधर मोहोळांनी विशाल गोखलेंसाठी केला पदाचा गैरवापर, १९७ कोटींचा हवाई घोटाळ्याचा रवींद्र धंगेकरांचा आरोप
- पुण्यात जमिनीचा मोठा धिंगाणा, मुरलीधर मोहोळ यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घेण्याची विजय वडेट्टीवार यांची मागणी



















