विशेष प्रतिनिधी
मधुबन (बिहार): JP Nadda भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याच्या प्रचाराच्या समाप्तीच्या पार्श्वभूमीवर आरजेडीवर जोरदार हल्ला चढवला. त्यांनी आरजेडी म्हणजे ‘रंगदारी’, ‘जंगलराज’ आणि ‘दादागिरी’चे प्रतीक असल्याचे सांगत लालू यादव यांच्या पक्षावर तीव्र शब्दांत टीका केली.JP Nadda
नड्डा म्हणाले की, “जेव्हा बिहारमध्ये आरजेडी सत्तेवर होती, तेव्हा राज्यात गुन्हेगारी, खून, अपहरण आणि भ्रष्टाचाराचे राज्य होते. लोक भीतीच्या वातावरणात जगत होते. पण आता मोदी आणि नितीश यांच्या नेतृत्वाखाली बिहारने विकासाच्या नव्या उंची गाठल्या आहेत. रस्ते, वीज, उद्योग आणि शिक्षण क्षेत्रात ऐतिहासिक बदल घडले आहेत.”JP Nadda
नड्डा यांनी सांगितले की, “भाजप सरकारने पारदर्शकता, विकास आणि सुशासन हे उद्दिष्ट ठेवले आहे. बिहार आज रोजगारनिर्मिती, गुंतवणूक आणि सामाजिक न्यायाच्या दिशेने झेप घेत आहे. मात्र, आरजेडी पुन्हा सत्तेत आली तर राज्य पुन्हा अराजकतेच्या दलदलीत जाईल.”
बिहारचा विकास टिकवायचा असेल तर मोदी-नितीश यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवा. राज्यात ‘जंगलराज’ परत येऊ देऊ नका., असे आवाहन नड्डा यांनी मतदारांना केले.
आरजेडीनेही त्यावर प्रत्युत्तर देत भाजपवर हल्लाबोल केला आहे. बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरींनी निवडणूक रंगतदार झाली आहे.
“RJD Symbolizes Rangdari, Jungle Raj, and Dadagiri; Bihar Witnessing Rapid Progress Under Modi-Nitish Leadership,” Says JP Nadda
महत्वाच्या बातम्या
- महिला डॉक्टरची आत्महत्या नसून संस्थात्मक हत्या, राहुल गांधी यांचा आरोप
- धंगेकर अन्यायविरोधात लढणारा कार्यकर्ता, पण आपल्याला महायुतीत दंगा नको, एकनाथ शिंदे यांची भूमिका
- मुरलीधर मोहोळांनी विशाल गोखलेंसाठी केला पदाचा गैरवापर, १९७ कोटींचा हवाई घोटाळ्याचा रवींद्र धंगेकरांचा आरोप
- पुण्यात जमिनीचा मोठा धिंगाणा, मुरलीधर मोहोळ यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घेण्याची विजय वडेट्टीवार यांची मागणी



















