विशेष प्रतिनिधी
फलटण : Ramraje Naik Nimbalkar’ मी कोणताही मास्टरमाइंड नाही, माझी आणि फलटण तालुक्याची बदनामी थांबवा. तत्कालीन डीवायएसपी राहुल धस यांच्या कार्यकाळाची एसआयटी चौकशी करा अशी मागणी विधानपरिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी पत्रकार परिषदेत केलीRamraje Naik Nimbalkar’
फलटण येथील डॉ संपदा आत्महत्या प्रकरणानंतर सुरू झालेल्या आरोपांच्या फैरींनी फलटण तालुक्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. या प्रकरणात माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी अप्रत्यक्षपणे ‘मास्टरमाइंड’ म्हणून केलेल्या उल्लेखावर रामराजे नाईक निंबाळकर यांनी उत्तर दिले. ते म्हणाले, माझ्यावर आरोप केला जातो की मी मास्टरमाइंड आहे. देवेंद्र फडणवीस यांची सभा रद्द व्हावी, यासाठी मी हे केल्याचे म्हटले जाते. पण असले उद्योग आम्ही करत नाही. ज्या हॉटेलमध्ये ही घटना घडली, त्याचाही मास्टरमाइंड मीच आहे का? या जिल्ह्यात पोलिसांना एका विशिष्ट व्यक्तीकडून ‘डायरेक्शन’ (निर्देश) जातात आणि त्याप्रमाणे सर्व गोष्टी घडतात.Ramraje Naik Nimbalkar’
पीडित महिला डॉक्टर यांनी फलटण ग्रामीण पोलिसांविरुद्ध त्यांच्या डिपार्टमेंटकडे तक्रार केली होती. मात्र, डीवायएसपी धस यांनी ती तक्रार दाबून टाकली, अशी माझी माहिती आहे, असा गौप्यस्फोट रामराजे यांनी केला. माझी राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे स्पष्ट मागणी आहे की, जशी या मुलीच्या मृत्यूची एसआयटी लावली आहे, तशीच डीवायएसपी धस यांच्या कारभाराचीही वेगळी एसआयटी लावली पाहिजे, अशी मागणी रामराजे यांनी केली.Ramraje Naik Nimbalkar’
धस यांच्या कार्यकाळावर गंभीर आरोप करताना रामराजे म्हणाले, धस यांच्या काळात वाळूचे किंवा इतर नंबर दोनचे धंदे करणाऱ्यांकडून हप्ते घेतले गेले नाहीत, असा एकही व्यक्ती नाही. याच काळात २७७ केसेस दाखल झाल्या. आमची माहिती अशी आहे की, एकाच फॉरमॅटमुळे फक्त नावे बदलून या केसेस दाखल केल्या गेल्या. या सर्व २७७ केसेस आपण वकिलांचा सल्ला घेऊन हायकोर्टात नेणार असून, त्याच्या एसआयटी चौकशीची मागणी करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.
माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्यावर टीका करताना रामराजे म्हणाले, आगवणे नावाच्या व्यक्तीचा उल्लेख करत, हा आगवणे १४ आणि १९ साली भाजपचा जर कार्यकर्ता होता. त्याला व्हिडिओ काढून ‘हे रामराजेंनी करायला लावले’ असे सांगण्यासाठी भाग पाडले गेले. मला किडनॅपिंग आणि खंडणीच्या खोट्या केसमध्ये अडकवण्याचा प्रयत्न झाला. त्यावेळी मी देवेंद्र फडणवीस यांना फोन केला. त्यांनी पुणे कमिशनरला सांगून ‘राजकीय माणसाला धक्का लागता कामा नये’ असे बजावले आणि तो विषय थांबला. मग आता सांगा, खरा मास्टरमाइंड कोण आहे?.
रामराजे यांनी स्पष्ट केले की, त्यांचा लढा हा भाजप पक्षाविरुद्ध नसून, सत्तेचा गैरवापर करणाऱ्या ‘विकृत’ मनोवृत्तीविरुद्ध आहे. या सर्व प्रकारांमुळे फलटण तालुक्याची बदनामी होत असून, आपण केवळ विकासाचे राजकारण करत आलो आहोत, असेही त्यांनी नमूद केले.
फलटणला काल नाटकाचा एक अंक झाला. त्यामध्ये दुधाने अभिषेक आणि रडण्याचे नाटक झाले. त्यांचा तो अभिनय ‘ऑस्कर’ देण्यासारखा होता’’, अशी टीका सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी केली.
I Am No Mastermind, Stop Defaming Me and Phaltan Taluka: Ramraje Naik Nimbalkar’s Strong Rebuttal
महत्वाच्या बातम्या
- महिला डॉक्टरची आत्महत्या नसून संस्थात्मक हत्या, राहुल गांधी यांचा आरोप
- धंगेकर अन्यायविरोधात लढणारा कार्यकर्ता, पण आपल्याला महायुतीत दंगा नको, एकनाथ शिंदे यांची भूमिका
- मुरलीधर मोहोळांनी विशाल गोखलेंसाठी केला पदाचा गैरवापर, १९७ कोटींचा हवाई घोटाळ्याचा रवींद्र धंगेकरांचा आरोप
- पुण्यात जमिनीचा मोठा धिंगाणा, मुरलीधर मोहोळ यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घेण्याची विजय वडेट्टीवार यांची मागणी



















