Tejashwi Yadav : दारुण पराभवानंतर राष्ट्रीय जनता दलात अंतर्गत बंड, लालू कुटुंबात संघर्ष, तेजस्वी यादवांनी बहीण रोहिणी आचार्याला घराबाहेर काढले

Tejashwi Yadav : दारुण पराभवानंतर राष्ट्रीय जनता दलात अंतर्गत बंड, लालू कुटुंबात संघर्ष, तेजस्वी यादवांनी बहीण रोहिणी आचार्याला घराबाहेर काढले

Tejashwi Yadav

विशेष प्रतिनिधी

पाटणा : Tejashwi Yadav बिहार विधानसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर राष्ट्रीय जनता दलामध्ये गंभीर अंतर्गत कलह उफाळून आला आहे. लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबातील संघर्षही आता उघडपणे समोर आला आह.. हा संघर्ष तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) यांचे निकटचे सल्लागार संजय यादव यांच्यामुळे निर्माण झाल्याचा आरोप लालूंची मुलगी रोहिणी आचार्य यांनी केला आहे. रोहिणी यांनी लालूंना किडनी दान केली होती.



शनिवारी रात्री उशिरा रोहिणी रडत राबडी देवी यांच्या निवासस्थानातून बाहेर पडल्या. त्यानंतर रविवारी सकाळी त्यांनी एक्स प्लॅटफॉर्मवर भावनिक पोस्ट केली. रोहिणी म्हणाल्या,“मला माझे माहेरचे घर सोडण्यास भाग पाडले. मला अनाथ केले. मी रडत घर सोडले. मला चप्पलने मारण्याचा प्रयत्न झाला. कोणत्याही घरात माझ्यासारखी मुलगी असू नये.”

पाटणा विमानतळावर पत्रकारांशी बोलताना
त्या म्हणाल्या, “माझे आता कुटुंब उरले नाही. त्यांनीच मला घरातून आणि कुटुंबातून बाहेर काढले. जग विचारत आहे की पक्षाची अशी अवस्था का झाली, पण कोणी जबाबदारी घेत नाही.”

रोहिणी यांनी स्पष्टपणे सांगितले की, तेजस्वी यादव यांचे दोन निकटचे सहकारी संजय यादव आणि रमीझ हे पक्षातील सर्व निर्णय नियंत्रित करतात. त्या म्हणाल्या,“हे प्रश्न आता तेजस्वी यादवांना विचारा. जर तुम्ही प्रश्न विचारलात तर तुम्हाला शिवीगाळ होईल आणि चप्पलने मारले जाईल.”

रोहिणींच्या म्हणण्यानुसार संजय यादव आणि राजदचे धोरणात्मक सल्लागार रमीझ यांनी त्यांच्यावर सतत दबाव टाकला होता.

२५ मे रोजी लालू प्रसाद यादव यांनी मोठा मुलगा तेज प्रताप यादव याला पक्ष आणि कुटुंबातून बाहेर काढले होते. यासाठीही तेज प्रताप यांनी संजय यादव यांना जबाबदार धरले होते.संजय यादव यांच्या सोबत वादानंतर रोहिणी यांनी सप्टेंबरमध्ये राजदच्या नेत्यांना आणि स्वतःच्या कुटुंबीयांनाही सोशल मीडियावरून अनफॉलो केले होते.
२०२० मध्ये ७५ जागा जिंकणाऱ्या राजदचा २०२५ च्या निवडणुकीत फक्त २५ जागांवर पराभव झाला.
तेज प्रताप यादव जवळपास ५० हजार मतांनी हरले.
तेजस्वी यादव कठीण संघर्षानंतर स्वतःची जागा राखण्यात कसोशीने यशस्वी ठरले.

तेज प्रताप सिंह यांनी पोस्ट करत लिहिले,
“जयचंदांनी राजदला पोकळ केले आहे.” त्यांनी आरोप केलेला रमीझ हा उत्तर प्रदेशातील बलरामपूरचा रहिवासी आहे आणि तुरुंगात असलेले माजी खासदार रिझवान झहीर यांचा जावई आहे. त्याच्यावर हत्येसह गंभीर गुन्ह्यांचे आरोप आहेत.तो राजदच्या सोशल मीडिया धोरणांसह संपूर्ण निवडणूक यंत्रणा सांभाळतो.त्याच्या पत्नीनेही विधानसभा निवडणूक लढवली आहे.

शनिवारीच रोहिणी यांनी एक्सवर लिहिले होते,
“मी राजकारण सोडत आहे आणि कुटुंबाशी संबंध तोडत आहे. संजय यादव आणि रमीझ यांनी मला हे करण्यास सांगितले. मी सर्व दोष स्वतःवर घेत आहे.”

Internal rebellion in Rashtriya Janata Dal after heavy defeat, conflict in Lalu family, Tejashwi Yadav throws sister Rohini Acharya out of house

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023