विशेष प्रतिनिधी
भंडारा : Praful Patel निवडणुकीसाठी पैसे लागतात. मात्र, कुणी म्हणत असेल की, पैसे असल्याने मी निवडूनच आलो तर, असं होत नाही. जितके पैसे लागतात ते खर्च करावेच लागतात आणि ते होणारच आहे. फक्त पैशाच्या आधारावर कोणी निवडून येत नाही. लोक पैसे घेतात आणि त्यांना जिथे वोट मारायचं असेल तिथेच मारतात, असे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांनी सांगितले.
भंडाऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ता, पदाधिकारी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक लढू इच्छिणाऱ्या उमेदवारांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. प्रफुल पटेल (Praful Patel) म्हणाले, निवडणुकीत मतदान घेण्यासाठी कार्यकर्ता आणि पदाधिकाऱ्यांनी नियोजन करावं. लोकांच्या घराघरापर्यंत पोहोचलं पाहिजे. मेहनत करा, घरी बसून कोणी वोट करणार नाही. यासाठी वातावरण निर्मिती सुद्धा करावी लागेल. कोणी स्वतःला बाहुबली समजत असेल तर, आम्ही अशा अनेक बाहुबलींना निवडून आणलेलं आहे. निवडणुकीसाठी पैसे लागतात. आपण महायुतीत असलो तरी, राष्ट्रवादी काँग्रेसनं आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. पैशाच्या पुढे कुणी म्हणत असेल की मी निवडून आलोच तर असं होत नाही. आपण सक्षम आहोत, इतरांना आपली चिंता करावी लागेल. समझनेवाले को इशारा काफी है!
आपण सक्षम आहोत. इतरांची चिंता करण्यापेक्षा इतरांना आपली चिंता करावी लागेल. कोणी बाहुबली आहे, असं समजू नका. त्यामुळं ते निवडून येणार आहे, असं समजू नका. किती बाहुबली लोकांना आम्ही निवडून दिलेलं आहे. असेही प्रफुल्ल पटेल म्हणाले. समझनेवाले को इशारा काफी है!
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची एक वेगळी ओळख आहे. आपण महायुतीत आहोत. पण आपण आपली वेगळी ओळख कायम ठेवलेली आहे. असे सांगून पटेल म्हणाले, शिव, शाहू, फुले, आंबेडकरांना मानणारा आपला पक्ष आहे. आपण सर्वांना सोबत घेऊन चालणारा पक्ष आहे. त्यामुळे जेव्हा मतदार नाव आणि चिन्ह बघेल तर ते आपल्याकडे ओढले जातील. त्यासाठी आपल्याला नियोजन चांगलं करायचं आहे. मेहनत करा. घरी बसून कोणी आपल्याला वोट करणार नाही. काम तर करावचं लागणार आहे. घरा-घरापर्यंत जावं लागणार आहे. यासाठी वातावरण निर्मिती सुद्धा करावी लागणार आहे.
No one gets elected on the basis of money, says Praful Patel on the mathematics of money in elections
महत्वाच्या बातम्या
- विराेधकांचा निवडणूक आयाेगाच्या नावाने शिमगा सुरू..संजय राऊत, राेहित पवारांचे मतचाेरीचे आराेप
- ताडाेबातील वाघ सह्याद्रीच्या घाटावर, तीन नर आणि पाच मादी वाघांचे स्थानांतर
- विराेधकांचा निवडणूक आयाेगाच्या नावाने शिमगा सुरू..संजय राऊत, राेहित पवारांचे मतचाेरीचे आराेप
- ताडाेबातील वाघ सह्याद्रीच्या घाटावर, तीन नर आणि पाच मादी वाघांचे स्थानांतर




















