विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: दिल्लीतील चर्चित कॅश फॉर क्वेरी घोटाळ्यात मोठी कारवाई होत असून लोकपालाने केंद्रीय अन्वेषण ब्युरोला तृणमूल काँग्रेसच्या (टीएमसी) खासदार महुआ मोइत्रा यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल करण्याची परवानगी दिली आहे. ही परवानगी लोकपालाच्या पूर्ण खंडपीठाने 12 नोव्हेंबर रोजी दिली आहे. सीबीआयने पुढील चार आठवड्यांत सक्षम न्यायालयात आरोपपत्र दाखल करून त्याची प्रत लोकपालाकडे जमा करावी असे आदेश देण्यात आले आहेत. Mahua Moitra
लोकपालाच्या आदेशात म्हटले आहे की, 2013 च्या कायद्यातील कलम 20(7)(a) आणि 23(1) नुसार सीबीआयला आरोपपत्र दाखल करण्याची परवानगी दिली जाते आणि त्याची प्रत लोकपालाच्या नोंदणीत जमा करावी. Mahua Moitra
महुआ मोइत्रा या टीएमसीच्या कृष्णानगर लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेल्या खासदार आहेत. त्यांच्यावर दुबईस्थित उद्योगपती दर्शन हिरानंदानी यांच्याकडून रोख रक्कम, लक्झरी भेटवस्तू आणि इतर फायदे घेऊन संसदेत उद्योगपती गौतम अदानी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात मुद्दाम प्रश्न विचारल्याचा आरोप आहे.
भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी ऑक्टोबर 2023 मध्ये या प्रकरणाचा प्रथम उलगडा केला होता. त्यांनी असा आरोप केला होता की महुआ मोइत्रा यांनी आपले लोकसभा लॉगिन आयडी आणि पासवर्ड हिरेनंदानी यांना दिला होता, ज्यामुळे राष्ट्रीय सुरक्षेचा धोका निर्माण झाला होता.
मोइत्रा यांनी सहाय्यकांच्या मदतीसाठी असे लॉगिन शेअर करणे सामान्य आहे असे म्हटले, परंतु तपासानुसार हिनंदानी दुबईमधून त्यांच्या खात्यात लॉगिन करून अदानी समूहाविरुद्ध प्रश्न पाठवत होता आणि त्याबदल्यात मोइत्रा यांना महागड्या भेटवस्तू आणि रोख रक्कम देत होता.
नोव्हेंबर 2023 मध्ये हे प्रकरण गाजू लागल्यावर लोकसभा एथिक्स कमिटीने 6-0 च्या मतांनी मोइत्रा यांच्या हकालपट्टीची शिफारस केली. 8 डिसेंबर 2023 रोजी त्यांना लोकसभेतून बाहेर काढण्यात आले.
दर्शन हिरानंदानी यांनी नंतर सरकारी साक्षीदार (अप्रूव्हर) बनून कबुल केले की ते मोइत्राच्या लॉगिनमधून प्रश्न सबमिट करत होते आणि त्यांना रोख रक्कम, लक्झरी बॅग्ज, शूज, आयफोन इत्यादी भेटी देत होते.
मोइत्रा यांनी आपली हकालपट्टी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले, परंतु 2024 च्या निवडणुकीत त्या पुन्हा कृष्णानगरमधून संसदेत निवडून आल्या.
मार्च 2024 मध्ये सीबीआयने महुआ मोइत्रा, दर्शन हिरेनंदानी आणि इतर अनोळखी व्यक्तींवर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याचे कलम 7, 8, 12 तसेच IPC कलम 120B (गुन्हेगारी कट) अंतर्गत गुन्हा दाखल केला.
तपासात CBI ला रोख रक्कम, सोन्याचे दागिने, महागडे मोबाइल फोन, लक्झरी वस्तू आणि परदेशी प्रवासाचे खर्च यांचे पुरावे मिळाले. हे सर्व व्यवहार मोइत्राच्या जवळच्या लोकांमार्फत पार पडत असल्याचा संशयही तपासात नोंदवला आहे.
जुलै 2025 मध्ये CBI ने संपूर्ण तपास अहवाल लोकपालाकडे सुपूर्द केला होता. त्या अहवालाचा अभ्यास केल्यानंतर लोकपालाने आरोपपत्र दाखल करण्यास अंतिम परवानगी दिली.
CBI ला आता चार आठवड्यांच्या आत सक्षम न्यायालयात आरोपपत्र दाखल करावे लागेल. त्यानंतर न्यायालयीन प्रक्रिया सुरू होईल.
Lokpal allows CBI to file chargesheet against TMC MP Mahua Moitra
महत्वाच्या बातम्या
- मुख्यमंत्र्यांचा मनाचा मोठेपणा, उद्धव ठाकरे यांची पुन्हा एकदा बाळासाहेब ठाकरे यांच्या राष्ट्रीय स्मारकाच्या सार्वजनिक न्यास अध्यक्षपदी नियुक्ती
- Uddhav Thackeray : ज्यांच्या सभेला खुर्च्या रिकाम्या होत्या त्यांचे सरकार आले, उद्धव ठाकरे म्हणाले बिहारचे गणित अनाकलनीय
- Praful Patel : पैशाच्या आधारावर कोणी निवडून येत नाही, प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले निवडणुकीतील पैशाचे गणित
- Tejashwi Yadav : दारुण पराभवानंतर राष्ट्रीय जनता दलात अंतर्गत बंड, लालू कुटुंबात संघर्ष, तेजस्वी यादवांनी बहीण रोहिणी आचार्याला घराबाहेर काढले




















