सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी अमित ठाकरेंसह 70 मनसैनिकांवर नेरूळ पोलिसांनी गुन्हा

सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी अमित ठाकरेंसह 70 मनसैनिकांवर नेरूळ पोलिसांनी गुन्हा

विशेष प्रतिनिधी

मुंबई : जमावबंदीचे उल्लंघन, परवानगीशिवाय कार्यक्रम आयोजित करणे आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र मनसे नेते अमित ठाकरेंसह 70 मनसैनिकांवर नेरूळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. Amit Thackeray

नेरूळ येथील राजीव गांधी उड्डाणपुलाजवळ उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनारूढ भव्य पुतळ्याचे उद्घाटन करताना जमावबंदीचे उल्लंघन, परवानगीशिवाय कार्यक्रम आयोजित करणे आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी मनसे नेते अमित ठाकरेंसह 70 मनसैनिकांवर नेरूळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. Amit Thackeray

पुतळ्याचे उद्घाटन करताना अमित ठाकरे यांनी म्हटले की, ‘महाराष्ट्रात, शिवछत्रपतींच्या भूमीत महाराजांचा हा अपमान आम्ही कधीच सहन करणार नाही! नवी मुंबईत शाखा उद्घाटनासाठी गेलो असताना समजलं की तब्बल चार महिने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा फक्त “लोकार्पणासाठी नेता मिळत नाही” म्हणून घाणेरड्या, फाटलेल्या कापडाने झाकून ठेवला आहे. पण, महाराष्ट्राच्या अस्मितेशी कुणाला खेळ करू देणार नाही.

मनसेने केलेल्या एका सोशल मीडिया पोस्टमध्ये अमित ठाकरेंनी म्हटले की, ‘माझी पहिली राजकीय केस शिवछत्रपतींसाठी लढण्याची असेल, तर मला त्याचा आनंदच होईल. निवडणुकांच्या वेळी महाराजांचा जयजयकार करणारे, भाषणातून शिवरायांच्या नावावर टाळ्या घेणारे… यांना पुतळ्याचे लोकार्पण करायला वेळ नाही? हे महाराष्ट्रात घडतंय, हेच लाजिरवाणं आहे.

Amit Thackeray for damaging public property.

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023