वाहतूक प्रश्नांवर पुणेकर हैराण, याेग्य व्यवस्थापन हाेत नसल्याचा सुप्रिया सुळे यांचा आराेप

वाहतूक प्रश्नांवर पुणेकर हैराण, याेग्य व्यवस्थापन हाेत नसल्याचा सुप्रिया सुळे यांचा आराेप

विशेष प्रतिनिधी

पुणे : वाहतुकीच्या प्रश्नांवर पुणेकर हैराण झाले आहेत. मात्र, प्रशासनाकडून याेग्य व्यवस्थापन केले जात नाही, असा आराेप राष्ट्रीय काॅंग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. Supriya Sule

पुण्यातील नवले आणि वारजे पुलाची पाहणी केल्यावर पत्रकारांशी बाेलताना सुळे म्हणाल्या, नवले पूल परिसरातील अपघात होऊ नयेत, यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. पण, रस्त्याची सुरक्षा हा विषय देशभर एकत्रितपणे उपाययोजना करून सोडवला पाहिजे. त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढावा लागेल, ज्यामुळे अपघातांची संख्या शून्य होईल. या मार्गावरील सर्व्हिस रोडचे कामदेखील तातडीने पूर्ण करण्याची मागणी केली.

सुळे म्हणाल्या, अपघाताच्या दिवशी मी दिल्लीत बैठकीसाठी होते. पण, तातडीने माहिती घेऊन सगळ्यांशी संपर्क साधला होता. आज अपघातस्थळाचा आढावा घेतला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी एक संस्था पाठवली होती, ज्यांनी या परिसरातील ब्लॅक स्पॉट ओळखले होते. रोड सेफ्टीसाठी उपाययोजना करण्यात आल्या होत्या, रॅम्ब्लर्स लावण्यात आले होते. २०२५मध्ये केवळ एकच अपघात झाला होता, ज्यामुळे थोडा दिलासा मिळाला होता. मात्र, त्यानंतर लगेच ही मोठी घटना घडली. येत्या १५ दिवसांत टेक्निकल गोष्टी समजून घेऊन उपाययोजना केल्या जातील आणि एक मोठं ऑडिट केलं जाणार आहे. पर्यायी रस्त्यांची योजना विचाराधीन असून, रिंग रोड हादेखील एक उपाय आहे. ३ हजार ५०० कोटी रुपयांचा नवीन एलिव्हेटेड रोड तयार करण्यात येणार आहे.’



शेतकरी सन्मान निधी योजनेवर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, हे सरकार शेतकऱ्यांच्या बाजूने आहे की, विरोधात हे माहिती नाही. सरकारने सरसकट कर्जमाफी करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होऊनही त्यांना मदत मिळाली नाही. राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत, हे सरकारचे अपयश आहे.

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सुळे म्हणाल्या, स्थानिक पातळीवर निवडणुका होत असून, सगळ्या आघाड्या आणि सगळ्या युती होत आहेत. सोमवारपर्यंत वाट बघू, सगळ्यांना कळेल काय होईल. सोमवारी रात्री चित्र स्पष्ट होईल. अनेक ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादीची युती झाली आहे.

पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरणावर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, ही लोकशाही आहे, प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे. मुख्यमंत्री यांना प्रश्न विचारा, त्यांना याबद्दल वास्तव माहिती असेल . अंजली दमानिया अनेक गोष्टी मांडत असतात. ईडी स्वायत्त संस्था आहे. ईडीवर कोर्टाने ताशेरे ओढले आहेत. संस्था चांगली आहे अदृश्य शक्ती जी मागे आहे, त्यामुळे असे होते.

Supriya Sule alleges that there is no proper management

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023