विशेष प्रतिनिधी
पालघर : कर्जमाफी नक्कीच महत्त्वाची आहे. आम्ही ती महत्त्वाचीच मानतो. पण कर्जमाफी हे शेती समस्येचं अंतिम उत्तर नाही. यामुळे तात्पुरता दिलासा मिळतो, पण भविष्यातील संकट टळत नाही, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. CM Devendra Fadnavis
फडणवीस म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या मिशननुसार राज्यातील 25 हजार हेक्टर शेती नैसर्गिक शेतीकडे वळवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यासाठी बियाणे कंपन्यांना आवश्यक ते मार्गदर्शन देण्याची प्रक्रिया सुरू आहे. अंतिम उपाय म्हणजे शेतीमध्ये शाश्वतता आणणे.
उत्पादन खर्च कमी झाला पाहिजे, उत्पादकता वाढली पाहिजे, तेव्हाच शेतकऱ्यांची खरी प्रगती होईल. शेतीमध्ये नवीन तंत्रज्ञान, स्मार्ट प्रकल्प आणि आधुनिक पद्धतींचा वापर हा काळाचा गरज असून याच माध्यमातून शेती नफ्यात आणता येईल.
पालघर प्रकरणातील आरोपीचा भारतीय जनता पक्षात प्रवेश झाला असल्याचा आरोप केला जात आहे. याविषयी देखील मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट केली. या संदर्भात फडणवीस म्हणाले की, मी संपूर्ण माहिती घेतली आहे. जोपर्यंत ते त्यांच्यासोबत होते, तो पर्यंत आरोप झाले नाहीत. त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करताच आरोप करण्यात येत असल्याचा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. स्थानिक पातळीवरच्या नेत्यांनी घेतलेला हा निर्णय असला तरी देखील त्यांनी सर्व शहानिशा करून हा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी मला सांगितले आहे. असे देखील देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
डबेवाला संघटनेचे आभार मानत देवेंद्र फडणवीस म्हणाले, आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील डबेवाल्यांच्या व्यवस्थापन कौशल्याचा अभ्यास केला जातो. डबेवाल्यांच्या घराचा प्रश्न सोडवण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. श्रीकांत भारतीया यांनी आंतरराष्ट्रीय केंद्र देखील सुरू केले. त्यामुळे त्यांचा विश्वास भारतीय जनता पक्षावर निर्माण झाला आहे. या डबेवाल्यांमध्ये सर्व माळकरी आणि वारकरी आहेत. अतिशय सहकारी लोक आहेत. त्यांचा पाठिंबा आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे मी त्यांना राजकारणात ओढू इच्छित नाही. मात्र त्यांचा पाठींबा आमच्यासाठी माऊलींचा आशीर्वाद आहे.
काँग्रेसने स्वबळावर निवडून लढवली किंवा आघाडीत लढले तर त्याचा फार परिणाम होणार नाही. जोपर्यंत काँग्रेसचे वरिष्ठ नेतृत्व हे भारताच्या मतदारांची नाडी समजून घेत नाही. भारताच्या मतदारांची मानसिकता समजून घेत नाही. जमिनीवर उतरून खऱ्या प्रश्नांचे राजकारण करत नाही. ते केवळ सोशल मीडियाचे हवेतला राजकारण करतील, तोपर्यंत काँग्रेसला भवितव्य नसल्याची टीका देखील देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
CM Devendra Fadnavis appeals to shift towards sustainable agriculture
महत्वाच्या बातम्या
- मुख्यमंत्र्यांचा मनाचा मोठेपणा, उद्धव ठाकरे यांची पुन्हा एकदा बाळासाहेब ठाकरे यांच्या राष्ट्रीय स्मारकाच्या सार्वजनिक न्यास अध्यक्षपदी नियुक्ती
- Uddhav Thackeray : ज्यांच्या सभेला खुर्च्या रिकाम्या होत्या त्यांचे सरकार आले, उद्धव ठाकरे म्हणाले बिहारचे गणित अनाकलनीय
- Praful Patel : पैशाच्या आधारावर कोणी निवडून येत नाही, प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले निवडणुकीतील पैशाचे गणित
- Tejashwi Yadav : दारुण पराभवानंतर राष्ट्रीय जनता दलात अंतर्गत बंड, लालू कुटुंबात संघर्ष, तेजस्वी यादवांनी बहीण रोहिणी आचार्याला घराबाहेर काढले



















