विशेष प्रतिनिधी
पुणे : नवले पुल परिसरात पुन्हा एकदा अपघात झाला. या अपघातात एक कंटेनर थार, अर्टिगा तसेच एका पिकअपला जाऊन धडकला. या अपघातात कोणतीही जीवितहानी अथवा जखमी झाले नाही. पोलिसांनी कंटेनर चालकाला ताब्यात घेतले असून त्याला मेडिकल साठी पाठवले असल्याची माहिती पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी दिली.
नवले पुलावर गुरुवारी संध्याकाळच्या सुमारास भीषण अपघात झाला होता. एका ट्रकने 20 ते 25 वाहनांना धडक दिली.
ट्रकचे ब्रेक फेल झाल्यानं भीषण अपघात झाला. अपघातानंतर लागलेल्या आगीत 8 जणांचा होरपळून मृत्यू झाला. तर अनेक जण जखमी झाले होते. त्यानंतर अपघात रोखण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या गेल्या असे सांगितले. केंद्रीय राज्य मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सर्व यंत्रणांची बैठकही घेतली होती. मात्र आज पुन्हा अपघात झाला.
गुरुवारच्या अपघातात साताऱ्याहून मुंबईच्या दिशेनं जाणाऱ्या मार्गिकेवर एका ट्रकचे ब्रेक फेल झाले. त्यामुळे चालकाचा ताबा सुटला आणि या ट्रकने 20 ते 25 वाहनांना धडक दिली. पुढे ट्रकने एका कारला धडक दिल्यानं ही कार धडक देणारा ट्रक आणि रस्त्यावरील आणखी एका ट्रकच्या मध्ये अडकली. त्याचवेळी आगीचा भडका उडाला. या घटनेनंतर पुण्यातील नवले पुलावर होणाऱ्या अपघातांचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
Another accident near Navle Bridge in Pune, container hits four to five vehicles!
महत्वाच्या बातम्या
- मुख्यमंत्र्यांचा मनाचा मोठेपणा, उद्धव ठाकरे यांची पुन्हा एकदा बाळासाहेब ठाकरे यांच्या राष्ट्रीय स्मारकाच्या सार्वजनिक न्यास अध्यक्षपदी नियुक्ती
- Uddhav Thackeray : ज्यांच्या सभेला खुर्च्या रिकाम्या होत्या त्यांचे सरकार आले, उद्धव ठाकरे म्हणाले बिहारचे गणित अनाकलनीय
- Praful Patel : पैशाच्या आधारावर कोणी निवडून येत नाही, प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले निवडणुकीतील पैशाचे गणित
- Tejashwi Yadav : दारुण पराभवानंतर राष्ट्रीय जनता दलात अंतर्गत बंड, लालू कुटुंबात संघर्ष, तेजस्वी यादवांनी बहीण रोहिणी आचार्याला घराबाहेर काढले



















