विशेष प्रतिनिधी
पालघर : पालघर साधू हत्येशी माझा संबंध नाही. मी आरोपी नाही, पोलिसांना मदत करण्यासाठी गडचिंचले येथे गेलो होतो. कृपया यात वेगळा रंग देण्याचा कोणीही प्रयत्न करू नका, असे आवाहन काशिनाथ चौधरी यांनी केले. प्रसारमाध्यमांवर सतत येत असलेल्या बातम्यांमुळे आपल्या कुटुंबाला प्रचंड मानसिक त्रास होत असल्याचे सांगताना काशिनाथ चौधरी यांना अश्रू अनावर झाले.
पालघर साधू हत्याकांड प्रकरणात काशिनाथ चौधरी यांच्यावर आरोप झाल्यानंतर त्यांचा भाजपमधील पक्षप्रवेश रोखला आहे. चौधरी यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली आहे. ते म्हणाले की, प्रसार माध्यमांवर येणाऱ्या बातम्यांमुळे माझ्या कुटुंबाला प्रचंड मानसिक त्रास झाला आहे. समाज माध्यमांवर प्रतिमा मलीन केली जात आहे. आमचे जगणे मुश्किल केलेले आहे. व्यक्तिगत मी सगळे सहन केले असते. मी अत्यंत संघर्षातून आलेला कार्यकर्ता आहे. अत्यंत प्रामाणिकपणे काम करत आहे. या राजकारणासाठी माझे राजकीय करिअर उद्ध्वस्त झाले तरी चालेल. परंतु यात माझे कुटुंब, माझी मुले भरडली जात आहेत.
ते पुढे म्हणाले, पालघर साधू हत्या प्रकरणाशी माझा काहीही संबंध नाही. मी पोलिसांच्या मदतीसाठी गडचिंचले येथे गेलो होतो. मात्र मलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्यात आले. साधूंचा जीव वाचावा म्हणून पोलिसांनी मला तिथे नेले. मात्र, जमाव आक्रमक असल्याचे आम्हाला तो सांभाळता आला नाही. मी सगळ्यांना हात जोडून विनंती करतोय की, कृपया यात वेगळा रंग देण्याचा कोणीही प्रयत्न करू नका, असे म्हणत त्यांना अश्रू अनावर झाले.
पक्षप्रवेश स्थगित झाल्यानंतरही काशिनाथ चौधरी यांनी भाजपसोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. “मला राजकीय आता काहीही बोलायचे नाही. भाजप प्रवेशाबद्दल माझे जिल्हा स्तरावरील पदाधिकाऱ्यांशी बोलणे झाले होते. भाजपने आरोप केले. मात्र, मला काहींनी आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. त्याचा मला आणि माझ्या कुटुंबाला प्रचंड मानसिक ताण होतोय. मी आता भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे, त्यामुळे मी कार्यकर्ता म्हणून भाजपचेच काम करेन” असे त्यांनी स्पष्ट केले.
काशिनाथ चौधरी हे पालघर जिल्ह्यातील स्थानिक नेते असून पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात कार्यरत होते. भाजपने त्यांच्यावर पालघर साधू हत्याकांडात मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप केला होता. तरीदेखील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने 16 नोव्हेंबर 2025 रोजी पक्षात प्रवेश दिला. या पक्षप्रवेशानंतर विरोधकांनी भाजपवर तीव्र टीका केली. परिस्थिती चिघळू नये म्हणून अखेरीस भाजप नेतृत्वाने त्यांचा पक्षप्रवेश स्थगित केल्याचे जाहीर केले.
Palghar Sadhu Lynching Says Kashinath Chaudhary as He Breaks Down at Press Meet
महत्वाच्या बातम्या
- मुख्यमंत्र्यांचा मनाचा मोठेपणा, उद्धव ठाकरे यांची पुन्हा एकदा बाळासाहेब ठाकरे यांच्या राष्ट्रीय स्मारकाच्या सार्वजनिक न्यास अध्यक्षपदी नियुक्ती
- Uddhav Thackeray : ज्यांच्या सभेला खुर्च्या रिकाम्या होत्या त्यांचे सरकार आले, उद्धव ठाकरे म्हणाले बिहारचे गणित अनाकलनीय
- Praful Patel : पैशाच्या आधारावर कोणी निवडून येत नाही, प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले निवडणुकीतील पैशाचे गणित
- Tejashwi Yadav : दारुण पराभवानंतर राष्ट्रीय जनता दलात अंतर्गत बंड, लालू कुटुंबात संघर्ष, तेजस्वी यादवांनी बहीण रोहिणी आचार्याला घराबाहेर काढले



















